Maharastra Politics : छगन भुजबळ यांच्या 'व्हायरल ऑडिओ क्लिप'वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange :  आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही, असं मनोज जरांहे भूजबळांच्या ऑडिओ क्लिपवर म्हणाले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Nov 6, 2023, 06:12 PM IST
Maharastra Politics : छगन भुजबळ यांच्या 'व्हायरल ऑडिओ क्लिप'वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...  title=
Manoj Jarange patil sharp response to Chhagan Bhujbal's audio viral clip

Manoj Jarange On Bhujbal OBC Morcha : अंतरवाली सराटीजवळून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एल्गार पुकारलाय. भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भुजबळ यांचं भव्य स्वागत करण्यात आले. येत्या 17 तारखेला जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा आवाहन भुजबळ यांनी केले आहे. मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ थेट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, दरम्यान, यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र, सोशल मीडियावर छगन भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio Clip) झाली होती. त्यावर आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपलं मत ठामपणे मांडलं आहे.

ऑडिओ क्लिपवर भुजबळांचं स्पष्टीकरण

जसं बाकीचे समाज आरक्षणासाठी एक झाले तसे मी माझ्या ओबीसी समाजाला आवाहन करू शकतो एवढंच त्यात होतं. मी ओबीसीच्या घरावर नाही म्हणलो सगळ्या ठिकाणी जे आहे आक्रमण सुरू झालेला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवल्या जात आहे. ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवल्या जात आहे या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे एक आवाजामध्ये बोललो पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. जसं दुसरे समाज आवाहन करू शकतात तसं मी ओबीसी समाजातील 375 जातींना आवाहन करू शकतो की आपण आपलं दुःख मांडलं पाहिजे आणि ते एक मुखाने मांडलं पाहिजे, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय.

जरांगे स्पष्टच म्हणाले...

करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य आहे लडेंगे और जितेंगे , त्यांना काय बोलायचं बोलू द्या,आमचं वाक्य लढणार आणि जिंकणार आहे. सगळी जनता आमची आहे, आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही.. आमचं लक्ष आता फक्त आरक्षण कडे आहे. वडेट्टीवार यांचं भुजबळ यांना पाठिंबा आहे मात्र त्यांचा कुणालाही पाठिंबा असतो, आम्हालाही त्यांचा पाठिंबा आहे, वड्डेटीवार म्हटले होते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, आमची त्यांची व्यथ एकच... भुजबळ यांची ऑडिओ क्लिप मी ऐकली नाही, राज्यात अशांतता करण्याचा त्यांचा प्रश्न आहे का असा प्रश्न आम्हाला पडलाय ते कितीही एकत्र आले, दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी आमचं मराठ्यांचा लक्ष विचलित होणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्टच म्हटलं आहे.

आणखी वाचा - कर्जत - जामखेडमध्ये वारं फिरलं!! रोहित पवारांना 'जोर का झटका', राम शिंदेंचं वर्चस्व कायम

आजच्या बैठकीला मी जाऊन काय करू ती प्रशासकीय बैठक आहे मी जाऊन काय कारू उगाच शायनिंग मला करायची नाही, माझे 5 प्रतिनिधी बैठकीला गेले आहेत. आम्हाला दगा फटका राज्यात कुणी करू शकत नाही, उगाच मजा करायला मुंबईत मोठ्या हॉस्पिटल मध्ये कशासाठी, इथले डॉक्टर खपाखप इंजेकॅशन देतात. आज शिष्टमंडळ येतो बोलले होते, माहीत नाही येईल की नाही..त्यांनी अजून पत्राचा मसुदा लिहला नाही म्हणतात, लिहायला ग्रंथ थोडी लिहायचा आहे.. त्यांना वेळ नसेल तर मी लिहून देतो, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.