पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर

Sindhudurg Grampanchayat Election Hairstyle: निवडणूका म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो प्रचार. मग ती निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचाराशिवाय ती पुर्ण होऊच शकत नाही. सध्या अशाच एका प्रचारानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. प्रचारासाठी एका मुलानं हटके आयडिया वापरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे. 

Updated: Dec 15, 2022, 12:20 PM IST
पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर title=
sindhurang election hairstyle

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग: निवडणूका जवळ आल्या की कार्यकर्ते, नेते प्रचाराला जोमाने लागतात. गावागावात जाऊन शहराशहरात जाऊन कार्यकर्ते आपला प्रचार (Election Campaign) करत असतात. सध्या अशीच एक निवडणूक आणि त्यातला प्रचार सर्वत्र चर्चेत आहे. यावेळी ही चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी झालेली पाहायला मिळते आहे. तुम्ही म्हणाल प्रचारात एवढं काय वेगळं आहे. तर हो, या प्रचारात एका लक्षवेधी हेअरस्टाईलनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या हेअरस्टाईलमधून एका मुलानं हटके प्रचार केला आहे. असं या हेअरस्टाईलमध्ये (hairstyle for election campaign) काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हीही उत्सुक असालच तेव्हा जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या प्रचाराबद्दल. (man promotes election candidate name by doing unique hairstyle putting name on his head see video)

सध्या सिंधुदुर्गमध्ये (sindhudurg election) ग्रामपंचायतीच्या निवडणूका सूरू आहेत. त्यामुळे गावागावात मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यातच अनेकजण प्रचारासाठी वेगवेगळ्या कल्पना रंगवताना दिसत आहे. या प्रचारात एका इसमानं चक्क आगळी वेगळी हेअरस्टाईल करत प्रचार रंगवला आहे. अर्थातच निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच. प्रचारासाठी अनेकजण आपल्या कल्पकतेचा वापर करून प्रचार करत असतात. सिंधुदुर्गात सध्या अशाच एका हटके स्टाईलच्या प्रचाराची म्हणूनच जोरदार चर्चा आहे. कणकवली (kankavali news) तालुक्यातील सर्वात मोठ्या फोंडाघाट ग्रामपंचायतची सध्या निवडणूक सुरू आहे यासाठी त्यानं ही शक्कल लढवली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी एका कार्यकर्त्याने चक्क आपलं डोकं लढवत हटके हेअरस्टाईल केली आहे. रितेश पावसकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. 

हेही वाचा - Farmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!

भाजप व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंचपदाच्या उमेदवार संजना आग्रे यांचं नाव आपल्या डोक्यावर कोरून हा कार्यकर्ता प्रचार करतो आहे. सध्या त्याची ही हटके हेअरस्टाईल सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून सर्वत्र त्याच्या अनोख्या प्रचाराच्या स्टाईलची चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावर ही हटके हेअरस्टाईल प्रसिद्ध झाली आहे.  

प्रचारानं जिंकली मनं 

सांगली जिल्ह्यातील (sangli khujgaon news) खूजगावच्या येथेही एका अनोख्या प्रचाराची सध्या चर्चा जोरात आहे. माती, पाणी, बैल जोडीचे पुजन करून आणि शेतकरी, शिक्षक, वायरमन, नर्स, सैनिक यांचे पाय धुऊन प्रचाराला त्यांनी सुरूवात केली आहे. सांगली जिल्ह्याच्या खूजगावच्या माजी सैनिक जोतिराम जाधव यांच्या सरपंच पदाच्या प्रचाराची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या प्रचाराचा शुभारंभ अनोख्या पद्धतीने केला आहे. वर म्हटल्याप्रमाणेे त्यांनी माती, पाणी, बैल जोडीचे पुजन केले आहे आणि गावातील शेतकरी, शिक्षक, वायरमन, नर्स, सैनिक यांचे पाय धुऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. शेतकरी ते सैनिक यांचे महत्व सांगत ते आपला प्रचार करत असता आणि इतरांप्रमाणेच पॅमप्लेंट  देऊन प्रचार करतात. त्याच्या या अनोख्या प्रचाराची सध्या चर्चा तासगाव तालुक्यासह जिल्ह्यातही जोरात सुरू आहे.