Maharastra Politics: महाराष्ट्र सदनात महापुरूषांचे पुतळे हटवले? Rohit Pawar यांच्या ट्विटने खळबळ

Rohit Pawar, Maharashtra Sadan: सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

Updated: May 28, 2023, 09:54 PM IST
Maharastra Politics: महाराष्ट्र सदनात महापुरूषांचे पुतळे हटवले? Rohit Pawar यांच्या ट्विटने खळबळ title=
Rohit Rajendra Pawar

Rohit Pawar On Sawarkar: नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Savarkar's birth anniversary) जयंती साजरी करण्यात आली. मात्र त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. पुतळे हटवून सरकारनं अहिल्यादेवी आणि सावित्रीबाईंचा अपमान केलाय, अशी टीका रोहित पवारांनी ट्वीट करून केलीय.

काय म्हणाले रोहित पवार?

महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय (chocklate boy) आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

पाहा ट्विट 

महापुरूषांचे पुतळे हटवण्यावरून उदय सामतांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीये. महाराष्ट्र सदनात काय झालं त्याची माहिती घ्यायला हवी कारण हा संवेदनशील विषय आहे. सगळ्या महापुरुषांचा आम्ही आदर करतो. माहिती न घेता बोलणं योग्य नाही, असं उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर देखील भाष्य केलं. 

आणखी वाचा - नाद करा पण अजित पवारांचा कुठं? हॉटेलमधलं बाथरुम पाहून मॅनेजरला म्हणाले...

आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही हे निर्विवाद सत्य आहे पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही भाजप शिवसेना युती (BJP Shiv Sena alliance) म्हणूनच लढणार, यातून दोघांनाही फायदा होणार असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी जे करू शकले ते दुसऱ्या कुठलेच पंतप्रधान करू शकले नाहीत हे त्रिकाल बाधित सत्य असल्याचं देखील सामंत यांनी यावेळी म्हटलं आहे.