याला म्हणतात चोरावर मोर! थेट पोलीस ठाण्यातून चोरी केलेला माल चोरी केला

थेट पोलिस ठाण्यासमोरुन चोरी केलेल्या मालाची चोरी करत चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिस काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 28, 2023, 07:42 PM IST
याला म्हणतात चोरावर मोर! थेट पोलीस ठाण्यातून चोरी केलेला माल चोरी केला title=

Pune Crime News : चोरावर मोर... अशी म्हण आहे. या म्हणी प्रमाणेच कृत्य चोरट्यांनी केले आहे. थेट पोलीस ठाण्यातून चोरट्यांनी चोरी केलेला माल लांबवला आहे. खेड शिवापूर पोलीस चौकीत हा प्रकार घडला आहे. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी धडक कारवाई करत हा माल पकडला होता. चोरट्यांचे धाडस पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमेतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे (Pune Crime News ). 

पोलिसांनी पकडलेल्या लाखो रुपयांच्या गुटख्याचीच चोरी 

पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या लाखो रुपयांचा गुटख्याचीच चोरी झाली आहे. चक्क खेड शिवापूर पोलीस चौकीच्या दारातू जप्त केलेल्या ट्रकसह 70 लाखांच्या गुटख्यावरच चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरांच्या शोधात राजगड पोलीस स्टेशनचे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी महामार्गावर धडक कारवाई करत गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक सह दोन आरोपींना ही पकडले होता. मात्र तोच ट्रक आणि तोच गुटखा चोरट्यांनी पोलीस चौकीच्या दारातून पळविला आहे. वरिष्ठ पातळीवर या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. मात्र, या चोरीमुळे संपूर्ण पोलीस खातं खडबडून जागे झाले आहे.

गोदाम फोडून सात लाखांची जबरी चोरी 

अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतिल राधास्वामी सत्संग जवळील एक गोदाम फोडून 7 लाखांची जबरी चोरी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. रात्री दोनच्या सुमारास चार दरोडेखोरांनी येथील चौकीदाराच्या डोळ्यावर दृश्यहीन द्रव स्प्रे मारून ताराने हातपाय बांधले. यानंतर दरोडेखोरांनी येथील लावलेले सात ते आठ सीसीटीव्ही कॅमेरे तोडून गोदामा मध्ये प्रवेश केला. या ठिकाणी असलेले 40 सिगरेट बॉक्स आणि एक चारचाकी वाहन सोबतच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप बॉक्स घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.

अवैध गुटख्यावर कारवाई

वाशिमच्या मालेगाव शहरात अवैध गुटख्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत 10 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. मालेगावातील या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. नाशिकमध्येही पोलिसांनी 64 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. शहा कॉलनी भागामध्ये सुगंधी तंबाखू, गुटखा तसेच पान मसाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.