नवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा

Maharashtra Winter Session 2023 : आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हजेरीने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 7, 2023, 10:43 AM IST
नवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा title=

Maharashtra Winter Session 2023 : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होत आहे.  शिवसेनेच्या फुटीनंतर अधिवेशनात पक्षाचे दोन गट सभागृहात बसले होते. यावेळी ही वेळ राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांवर आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दुसऱ्यांचा समोरासमोर येणार आहे. मात्र अद्यापही अजित पवार गटात इनकमिंग सुरुच आहे. मनी लॉड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात जाऊन आलेले नवाब मलिक (Nawab Malik) नेमके कोणत्या गटात जाणार अशी चर्चा सुरु असताना मोठी घडामोड समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक अजित पवार गटात जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या कार्यालयात गेल्याने त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली का अशी चर्चा सुरु आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी थेट अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यावेळी नवाब मलिक यांनी दत्ता भरणे यांच्यादेखील चर्चा केली. त्यामुळे मलिक नेमके कोणत्या गटात आहे अशी चर्चा सुरु असताना त्यांनी थेट अजित पवार गटाच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यामुळे आता मलिक हे अजित पवार गटात जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधारी यांना घेण्यासाठी आंदोलन करणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान त्याचबरोबर महिलांचे प्रश्न या सगळ्या संदर्भात विरोधक आज पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या आमदारांचं माजी आमदारांचे निधन झाले आहे यांचा शोक प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्याचबरोबर राज्यपालांकडे पाठविण्यात आलेले विधेयके समताला अनुमोदन दिले की नाही या सगळ्या संदर्भातली माहिती पटलावर ठेवली जाणार आहे. विधिमंडळाचे कामकाज संपताच ठाकरे आणि शिंदे गटाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून केली जाणार आहे. शिंदे गटाचे आमदार यांची आज उलट साक्ष नोंद केली जाणार आहे