'झी 24 तास'चा दणका; प्रशासन झाले जागे, केंद्रीय पुरातत्व खात्याकडून अंबाबाई मूर्तीची पाहणी

Inspection of idol of Ambabai Temple :  केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी कोल्हापूरच्या ( Kolhapur ) अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत. ( Kolhapur Ambabai Temple)  'झी 24 तास'ने अंबाबाई देवीच्या मूर्तीची कशा प्रकारे झीज झाली आहे हे पुराव्यानिशी दाखवले होते. मूर्तीची झीज होत असल्याची बातमी दाखवताच प्रशासन जागे झाले.  केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी आता अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली आहे.

Updated: Mar 14, 2023, 10:18 AM IST
 'झी 24 तास'चा दणका; प्रशासन झाले जागे, केंद्रीय पुरातत्व खात्याकडून अंबाबाई मूर्तीची पाहणी title=

Inspection of idol of Ambabai Temple : सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'चा दणका. केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी कोल्हापूरच्या ( Kolhapur ) अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत. ( Kolhapur Ambabai Temple)  'झी 24 तास'ने अंबाबाई देवीच्या मूर्तीची कशा प्रकारे झीज झाली आहे हे पुराव्यानिशी दाखवले होते. मूर्तीची झीज होत असल्याची बातमी दाखवताच प्रशासन जागं झालं. त्यानंतर मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी आता अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली आहे.

याआधी 28 फेब्रुवारीला राज्य पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. दोन अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीची पाहणी करुन त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफही घेतले होते. आता पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे  'झी 24 तास'च्या बातमीनंतर मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पुरातत्व विभागाची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.

आंबाबाई मदिरातील मूर्तीची झीज होत होती. याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा पाठपुरावा 'झी 24 तास'ने केला होता. याला आता यश आले आहे. दरम्यान, आता अंबाबाई मंदिरातील श्री पुजकाने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अंबाबाई देवीच्या मूर्तीला झालेल्या इजेनंतर पुरातत्व विभागाने नवरात्र उत्सवाच्या तोंडावर मूर्तीची संवर्धन प्रक्रिया एका रात्रीत राबवली होती. त्यानंतर आता  अंबाबाई मंदिरातील श्री पुजकाने अहवालाची मागणी केली आहे. आता कोर्ट काय निर्णय देणार याची उत्सुकता लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी

- अंबाबाई मंदिरातील श्री पुजकाची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव
- यापूर्वी घाईगडबडीत केलेल्या मूर्ती संवर्धनाचा रिपोर्ट मिळावा - श्री पूजक गजानन मुनींश्वर याची मागणी
- अंबाबाई देवीच्या मूर्तीला झालेल्या इजेनंतर पुरातत्व विभागाने नवरात्र उत्सवाच्या तोंडावर मूर्तीची संवर्धन प्रक्रिया एका रात्रीत राबवली होती
- श्री पूजकांच्या मागणीनंतर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी