Weather Update: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. यंदा तर अगदी हिवाळा सुरू होईपर्यंत पाऊस पडत होता. परिणामी हिवाळा देखील जास्त दिवस राहणार असा अंदाज लावण्यात आला आहे. तर नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मराठवाड, विदर्भ व परिसरात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 25 जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे मुख्य कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
4 Dec, Latest satellite obs at 9.25 pm indicates partly cloudy sky over parts of interior Maharashtra, Pune Satara,parts of Marathwada & Vidarbha too.
This resulted in reduction in Tmax too at many places. pic.twitter.com/TjTCoWnLAI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 4, 2023
अनेक राज्यात थंडीच कडाका सुरु आहे. तर काही राज्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला असून काही भागात ढगाळ वातावरण आहे. म्हणजेच राज्यातील वातावरणात सातत्याने चढ-उताराचा खेळ सुरू आहे. अशातच आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भतील पावसाच अंदाज वर्तवला आहे.तसेच दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे 23 जानेवारीपासून पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा कहर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृ्ष्टीता अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर 23 जानेवारीपासून उत्तर भारता पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि शेजारच्या भागात चक्रीवादळाच्या रूपात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. 23 जानेवारीला पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 24 ते 27 जानेवारी दरम्यान दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25-27 जानेवारी दरम्यान उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.