Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 28, 2024, 07:09 AM IST
Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती  title=

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्माघात अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे काही दिवस भरपूर ऊन्हाचा तडाखा झेलावा लागणार आहे. नागरीकांना स्वतःची काळजी घेण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाची शक्यता देखील वर्तवली आहे. 

मुंबईत कसं असेल वातावरण

हवामान खात्याने मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस भरपूर गरमीचा त्रास होणार असल्याचं सांगितलं आहे. तर विदर्भ, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा असेल. 

मुंबईच्या हवामान खात्याने 27 ते 29 पर्यंत ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांमध्ये उष्माघाताचे प्रमाण अधिक असेल असे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. 

या जिल्ह्यांमध्ये 40 च्या पार पारा 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी राज्यांच्या अनेक ठिकाणचं तापमान हे 40 डिग्री सेल्सियसर्यंत पोहोचलं होतं. सगळ्याधिक तापमान हे ४२.७ डिग्री सेल्सियस जळगावमध्ये नोंदवलं गेलं. तर चंद्रपुरमध्ये ४२.६ डिग्री सेल्सियस, वाशिममध्ये 42.6, जेऊर 42.5 डिग्री सेल्सियस, धुळ्यात 42 डिग्री सेल्सियस तर मालेगावमध्ये 42 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

27 ते 29 एप्रिलपर्यंत या भागांसाठी अलर्ट

हवामान खात्याने (IMD) 27 ते 29 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील ठाणे आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या भागांसाठी 27 ते 29 एप्रिल दरम्यान IMD अलर्ट शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी बुधवारी सांगितले की, 27 आणि 28 एप्रिल रोजी तापमान खूप जास्त असेल. मुंबई आणि आजूबाजूच्या भागांसाठी या महिन्यातील ही दुसरी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कडक ऊन होते. नवी मुंबईतील अनेक भागात तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, असे शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी बुधवारी सांगितले. मुंबई आणि आजूबाजूच्या भागांसाठी या महिन्यातील ही दुसरी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कडक ऊन होते. नवी मुंबईतील अनेक भागात तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले.