कोरोनामुळे विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली

केंद्रीय निवडणूक आयोगाने  विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे

Updated: Apr 4, 2020, 01:45 PM IST
कोरोनामुळे विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली title=

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची पुढील तारीख जाहीर करणार आहे.

याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता २६ मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूकही पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.