मुंबई : Municipal Elections News : महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची बातमी. मुंबईबरोबरच अन्य 13 महापालिकांची आरक्षण सोडतही आज होणार आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission) 31 मेपर्यंत सोडत काढून 13 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापालिकांना दिलेत. त्यानुसार आज ही सोडत होत असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणाची सोडत निघेल. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या प्रवर्गाचा मात्र सोडतीमध्ये समावेश नसेल.
निवडणूक आयोगाने ( Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहेत. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कुठल्या महापालिकांमध्ये आज सोडत निघणार आहे. त्याची माहिती जाणून घ्या.
1-नवी मुंबई
2- वसई विरार
3- कल्याण-डोंबिवली
5-ठाणे
6--उल्हासनगर
7-नाशिक
8-पुणे
9- पिंपरी-चिंचवड
4-कोल्हापूर
10-अमरावती
11- सोलापूर
12-अकोला
13- नागपूर