UPSC Result 2022 | शेतकरी बापाचं ऋण फेडलं; कठीण परिश्रमातून ओंकारने पूर्ण केलं IAS होण्याचं स्वप्न

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. देशातील ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रतिष्ठीत अशा सनदी अधिकारी पदांवर होते. साताऱ्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या अशाच एका तरुणाने आपलं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.(UPSC civil services 2021)

Updated: May 31, 2022, 08:57 AM IST
UPSC Result 2022 | शेतकरी बापाचं ऋण फेडलं; कठीण परिश्रमातून ओंकारने पूर्ण केलं IAS होण्याचं स्वप्न title=

UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. देशातील ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रतिष्ठीत अशा सनदी अधिकारी पदांवर होते. साताऱ्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या अशाच एका तरुणाने आपलं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.(UPSC civil services 2021)

जावळी तालुक्यातील सनपाने गावाच्या ओंकार मधुकर पवार (Onkar madhukar pawar) या तरुणाने युपीएससी घेत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत 194  रँक मिळवली आहे. ओंकार दोन वर्षापूर्वी युपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्या सीएपीफ (CAPF)या परीक्षेतही उत्तीर्ण झाला होता. परंतू IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अथक अभ्यास सुरू ठेवला.

ओंकारचं प्राथमिक शिक्षण सनपाने गावात तर माध्यमिक शिक्षण हुमगाव इथे झालं. पुण्यात इंजिनिअरिंग पूर्ण करून त्याने UPSC ची तयारी केली.  

ओंकार मधुकर पवार यानं युपीएससीमध्ये (upsc) देशात 194 वा रँक मिळवून IAS व्हायचं स्वप्न पूर्ण केलंय. 

ओंकारचे वडील हे शेतकरी असून अतिशय कष्ट आणि मेहनतीनं त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. त्याचं संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. ओंकारचं युपीएससी परीक्षेतील यश हे सनदी अधिकारी होऊ इच्छिनाऱ्या तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.