HSC Board Exams : बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून

बारावीच्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये (HSC Board Exams) मोठी चूक झाली आहे.  बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. 

Updated: Feb 21, 2023, 05:35 PM IST
HSC Board Exams : बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून  title=

HSC Board Exams : बारावीच्या  परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या या परिक्षेच्या पहिल्याच  दिवशी मोठा घोळ पहायला मिळाला (HSC Board Exams).  बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक झाली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले ( Error in English Subject Question Paper). प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

  पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा पेपर होता. बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये प्रश्न ऐवजी  उत्तर छापून आले. यामुळे शिक्षण मंडळाची चूक उघड झाली आहे. 

आजच्या बारावी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. आता या प्रश्नाचे मार्क मिळणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. तर,  शिक्षण मंडळ या चुकीबाबातक काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम आहे. 

पहिल्याच पेपरमध्ये सहा मार्कांची लॉटरी ?

इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित आहे. पान नंबर 10, प्रश्न क्रमांक 3 , उप प्रश्न, A3 2 मार्क  तपासणाऱ्याला सूचना दिली आहेत.  प्रश्न ऐवजी A4 (2 मार्क) थेट उत्तर देण्यात आले आहे. कवितेवर आधारित प्रश्नचे हे उत्तर आहे. 
A5 (2 मार्क) येथे तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही.  त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते. अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या. 

इयत्ता १२वी आजच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण, नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल अशी माहिती समोर आली आहे. बोर्डाकडून खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केले आहे. 

बोर्डाचे कॉपीमुक्त अभियान

यंदाच्या वर्षी परीक्षांदरम्यान बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात येणारी झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.तसेच मोबाईल वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे. 

यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी काही बदलांमध्ये बदलही झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेआधी पोहोचणं अपेक्षित असून, सकाळी 10.30 वाजल्यानंतर आणि दुपारी 2.30 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, अशी ताकिदच बोर्डाकडून देण्यात आली आहे.