Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं

Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी 

Updated: Jan 16, 2023, 01:30 PM IST
Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं title=
Maharashtra Solapur News Siddheshwar yatra Natural calamity Latest Marathi news

Solapur News : जसा (India) भारत विविधतेनं नटलेला आहे, अगदी तसंच महाराष्ट्रातही विविधतेनं नटलेल्या अनेक परंपरा, प्रथा आणि चालीरिती पाहायला मिळतात. जसजसा तुम्ही अमुक एखादा प्रदेश ओलांडायला निघता, त्यावेळी सीमा ओलांडता ओलांडता अनेक बदल आपल्या लक्षात येऊ शकतात. मग ते अन्नपदार्थांमधील (Food Culture) असो किंवा सणउत्सवांमधील असो (Festivals). अगदी गावोगावच्या जत्रा- यात्राही तितक्याच वैविध्यपूर्ण आणि स्थानिकांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाच्या असतात. सध्या अशीच एक यात्रा चर्चेचा विषय ठरत आहे, ती म्हणजे सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा. 

गावची यात्रा म्हटलं की बगाड, गुलाल, भंडारा, हलगीवर ठेका धरणारी गावकरी मंडळी असं चित्र डोळ्यासमोर येतं. सारा गाव आणि शहरातील मंडळीसुद्धा या दिवशी ग्रामदेवतेपुढं नतमस्तक होताना दिसतात. हे वातावरण भारावणारं असतं. यंदाच्या वर्षी सिद्धेश्वर यात्रेत (Siddheshwar yatra) हाच उत्साह पाहायला मिळाला. दिवस पुढे चालला होता रविवारी यात्रेचा होमविधी पार पडला आणि त्यानंतर मानाचे ध्वज एका सभागृहाबाहेर विश्रांतीसाठी आले. तिथंच बहुचर्चित अशा भाकणुकीचा कार्यक्रमही पार पडला. 

या भाकणुकीमध्ये यंदाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी काही असे संकेत दिले जे संपूर्ण राज्याचीच चिंता वाढवू शकतात. 

भाकणुकीत नेमकं काय झालं? 

परंपरेप्रमाणं यावेळी यात्रेसाठी उपाशी ठेवलेल्या वासराला भाकणुकीच्या ठिकाणी आणलं गेलं. तिथं मानकऱ्यांनी त्याची पूजा केली आणि सुरुवातीला त्यानं (वासरानं) मलमूत्र विसर्जन केलं. हा एक इशाराच होता, कारण वासराच्या या कृतींनी यंदा भरपूर पाऊस पडणार याला दुजोरा दिला होता. वासराला सुरुवातीपासूनच काहीसं घाबरलेलं पाहून 2023 हे वर्ष काहीसं धोक्याचं असून, हिरेहब्बू यांनी नैसर्गिक आपत्तीमुळं ओढावणाऱ्या संकटांकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 

हेसुद्धा पाहा : Special Report on Baba Vanga Prediction | 2023 साठी बाबा वेंगाची 7 भाकितं कोणती?

गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण वासराला इतकं बिथरलेलं पाहिलं असल्याचं सांगत त्यांनी 1993 मधील किल्लारी भूकंपाच्या वेळीसुद्धा असंच काहीसं घडल्याची आठवण करून दिली. बरं ही भाकणुक इथंच थांबली नाही. तर, वासरासमोर ज्यावेळी गूळ, खोबरं, बोरं, गाजर, पान- सुपारी आणि धान्य ठेवण्यात आलं तेव्हा त्यानं कशालाच स्पर्श केला नाही. त्याची ही कृती जीवनावश्कय वस्तूंच्या किंमतींमध्ये कोणतेही मोठे चढ उतार दिसणार नाहीत याकडे खुणावते असं भाकित वर्तवलं. 

बाबा वेंगा, नॉस्त्रेदमस आणि आता सिद्धेश्वर यात्रा.... (baba venga, nostradamus preditions )

2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बाबा वेंगा यांची जगबुडी होणार, वैश्विक युद्ध होणार, पृथ्वीचा नाश होणार ही भाकितं अनेकांना धडकी भरवून गेली. त्यातच नॉस्त्रेदमसच्या भाकितांचीही भर पडली होती. पण, यामध्येच आता राज्यातील सिद्धेश्वराच्या यात्रेतून भाकणुकीमुळं समोर आलेली ही भाकितं पाहता, खरंच हे वर्ष धोक्याचं आहे का हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. 

(प्रसिद्ध करण्यात आलेलं वृत्त स्थानिकांचे अनुभव आणि त्यांच्या समजुतीतून घेण्यात आला आहे. धार्मिक मान्यतांची त्याला जोड आहे. या गोष्टी सर्वांनाच पटतील असं नाही. झी 24 तास कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा अमानवी प्रकाराला दुजोरा देत नाही, सदरील गोष्टींबाबत खाजरजमा करत नाही.)