Raj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..."

Raj Thackeray On Supreme Court Verdict: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाचाही उल्लेख केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 12, 2023, 01:28 PM IST
Raj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..." title=
Raj Thackeray On Supreme Court Verdict

Supreme Court Verdict Raj Thackeray Rects: सुप्रीम कोर्टाने गुरुवारी राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाचा निकाल (Supreme Court Verdict) देताना राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्या स्थानप केलेलं सरकार बरखास्त करण्यास नकार दिला आहे. शिंदे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र त्याचवेळी सत्तास्थापन करताना घडलेल्या अनेक गोष्टी या कायद्याला धरु नसल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं. तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: राजीनामा दिल्याने पुन्हा त्यांना त्या पदावर बसवण्यासंदर्भातील निर्देश देऊ शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच सत्ताधारी सरकार कायदेशीर असल्याचं सांगत आहेत तर विरोधकांकडून नैतिकतेच्या आधारावर सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देऊन निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. याच दाव्या प्रतिदाव्यांदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या निकालावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कोर्टाची भाषा कॉम्पिलिकेटेड

राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना राज यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. कोर्टाच्या निकालाची भाषा फार किचकट असते असं राज यांनी सुरुवातीला म्हटलं. "कोर्टाची भाषा वाचल्यावर समजत नाही की आपल्याला अटक केली आहे की सोडलं आहे. इतकी कॉम्पिलिकेटेड भाषा असते ती," असं राज म्हणाले. तसेच पुढे बोलताना राज यांनी, "कालच्या (सुप्रीम कोर्टाच्या) निकालात त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. मी जे वाचलं त्याप्रमाणे विधीमंडळातील गटाला पक्ष म्हणून समजलं जाणार नाही तर बाहेरचाच पक्ष समजला जाणार. आता ही घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.

निवडणूक आयोगाचाही केला उल्लेख

तसेच राज यांनी पुढे बोलताना निकालानंतर निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल हे ही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. "या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या निर्णयानंतर निवडणूक आयोग काय करणार? हे सगळं कन्फ्युजींग आहे. ही सगळी धूळ खाली बसल्यानंतर आपल्या सर्वांना कळेल की नक्की काय झालं आहे," असं राज यांनी म्हटलं आहे.

मागील काही काळापासून राज ठाकरे यांच्या भाजपा नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज यांनी या निकालामध्ये अधिक स्पष्टता येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.