Maharashtra Politics : माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी गावाच्या विकासाला निधी देणार नाही, अशी धमकीच भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवलीतील (Kankavali) नांदगावच्या ग्रामस्थांनी दिलीय. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही, निधी वाटप आता माझ्या हातात आहे, हे लक्षात ठेवा असंही ते म्हणालेत. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले नितेश राणे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) नितेश राणे कणकवलीत आले होते. यावेळी ग्रामस्थांसमोर भाषण करताना नितेश राणे यांनी आपण आता सत्तेत आहोत, त्यामुळे सगळं काही आपल्या हातात आहे असं सांगत माझ्या विचारांचा जे गाव सरपंच देईल त्या गावाचा मी विकास करेल असा इशाराच दिला. इतकंत नाही तर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर निधी मिळणार नाही अशी धमकीही नितेश राणे यांनी दिली.
आपण जे बोललो आहे त्याला इशारा समजा किंवा धमकी, आपलं गणित स्पष्ट आहे, त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे. मी सत्तेत असणारा आमदार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी कोणीही मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
वैभव नाईक यांची टीका
नितेश राणेंच्या या धमकीवरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधलाय. नितेश राणे यांना सत्तेचा माज आल्याची टीका नाईकांनी केलीय.