Maharashtra Politics : महाराष्ट्रासाठी अमित शहांचं प्लॅनिंग ठरलं?

2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे पण भाजपनं आतापासूनच तयारी सुरु केलीये.

Updated: Nov 4, 2022, 10:54 PM IST
Maharashtra Politics : महाराष्ट्रासाठी अमित शहांचं प्लॅनिंग ठरलं? title=

गणेश कवडे, झी २४ तास, मुंबई : एकीकडे गुजरात जिंकण्याची जबाबदारी महाराष्ट्र भाजपच्या (BJP) नेत्यांवर टाकण्यात आलीय तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) जिंकण्याची तयारीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुरु केलीय. खुद्द अमित शहांनी (Amit shah) महाराष्ट्रासाठीच्या रणनीतीत लक्ष घातलंय. काय आहे भाजपचं व्हिजन 2024....पाहुया

निवडणूक कोणतीही असो भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतो. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे पण भाजपनं आतापासूनच तयारी सुरु केलीये. महाराष्ट्रासाठी भाजपनं जी प्लानिंग केलीय त्यात खुद्द अमित शहांनी लक्ष घातलंय. लोकसभा मतदारसंघांप्रमाणेच विधानसभा मतदारसंघांसाठी खास रणनीती आखण्यात आलीय. 

भाजपची रणनीती काय? -

  • विधानसभेच्या 200+ जागा जिंकण्याचं टार्गेट
  • लोकसभेच्या 45+ जागा जिंकण्याची रणनीती
  • भाजप उमेदवार हरलेल्या मतदारसंघात जोर लावणार
  • जिथे भाजपचा आमदार नाही, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष
  • भाजप आमदार नाही तिथे विधानपरिषद, राज्यसभा खासदार निधी खर्च करणार

राज्यसभा खासदार अनिल बोंडे, विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती नेमण्यात आलीये

दुसरीकडे गुजरात जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची टीम गुजरातमध्ये दाखल झालीय. महाराष्ट्रातल्या 12 आमदारांसह 50 पदाधिकाऱ्यांवर गुजरातच्या 33 मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. मुंबईतील भाजपचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात ही टीम काम करणार आहे. दक्षिण गुजरातमधील डांग, वलसाड, नवसारी, सुरत, तापी आणि भरुच या सहा जिल्ह्यांची जबाबदारी महाराष्ट्र भाजपवर सोपवण्यात आलीय.

कोणतीही निवडणूक असली तरी भाजप ती हलक्यात घेत नाही, भाजपचा कितीही दिग्गज नेता असला तरी तो प्रत्येक जबाबदारी पार पाडतो. मोदी-शहा प्रचारात स्वतला झोकून देतात, अगदी दारोदारी फिरून पत्रकही वाटतात. तसं पाहिलं तर 2024 दूर आहे, तसंच गुजरातमध्येही भाजपची ताकद आहे. पण या निवडणुकींसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केलीय.