महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर

Maharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 8, 2024, 05:09 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर title=

Ajit Pawar : तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा नाही.  असं अजित पवारांनी स्वत: जाहीर केले होते. अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा देखील देखील रंगली होती. यामुळे अजित पवार नेमकं कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. 

बारामती आणि अजित पवार हे जणू समीकरणच...1991पासून सलग सातव्यांदा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार झालेत. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये  शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळेंनी त्यांची नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला कुणाचा ? याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळालं. सुनेत्रा यांचा पराभव अजित पवारांसाठी हा फार मोठा धक्का होता.. तसेच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची असल्यानं बारामतीमध्ये अजित पवारांनी या पराभवाबाबत खंत व्यक्त केलीय.  

विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्या सामना टाळण्यासाठी अजित पवारांनी जय पवारांचं नाव पुढं केल्याची चर्चा रंगली. अजित पवारांनी पहिल्यांदा जेव्हा जय पवारांचं नाव पुढं केलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही त्यांच्या या प्रस्तावाला विरोध केला होता. एवढंच नव्हे तर बारामतीतून एक लाख सह्याही गोळा केल्या होत्या. बारामतीतून अजित पवारच उमेदवार असतील असं पक्षातून सांगण्यात आलं असतानाही अजित पवारांनी पुन्हा बारामतीतून मी जो उमेदवार देईन तो निवडून द्या असं भावनिक आवाहन  केले होते. 

मात्र,  येत्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा बारामतीऐवजी शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेरीस अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढणार अशी घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.