Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 2, 2023, 05:14 PM IST
Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका! title=
Sharad Pawar On Ajit pawar NCP revolt

Sharad Pawar On Ajit pawar NCP revolt: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी थेट भाकरी फिरवल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रोहित पवार त्यांच्यासह दिसले. त्यावेळी त्यांनी मोदींना टोला लगावला.

दोन दिवसांपूर्वी मोदींनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होतं. मला आनंद आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली त्यामुळे त्यांनी या आरोपातून राष्ट्रवादीला मुक्त केलं. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असं मी म्हणेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सहकाऱ्यांची भूमिका येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

1980 साली मला 56 आमदार आम्हाला सोडून गेले. त्यावेळी 5 ते 6 आमदार घेऊन पुन्हा पक्ष उभा केला. हा माझ्यासाठी नवी गोष्ट नाहीये. मी पुन्हा लोकांच्या मध्ये जाईल आणि त्यांना माझा निर्णय सांगेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवार यांच्यासह इतर 9 जणांवर कारवाई होणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. 6 जुलैला पक्षाची बैठक बोलावली आहे. माझा तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे.  उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. मी उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पक्ष म्हणून तुम्ही काहीही भूमिका घेणार का? आम्ही लोकांना आमचा निर्णय घेऊ. आम्ही भांडण करणार नाही. लोकांची भूमिका समजून घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटल्याने आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी थेट निर्णय दिली. प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार. पटेलांनी जबाबदारी पार पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. पक्ष फुटला आणि घर फुटलं असं मी म्हणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. गेले त्यांची चिंता नाही. मात्र, मला त्यांच्या भवितव्याची चिंता नाही, असं म्हणत शरद पवार यांनी अजितदादा गटाला थेट इशारा दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

शुक्रवारी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, असा अजित पवार (Ajit pawar) यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणुका असोत त्याच पक्षाच्या चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

आणखी वाचा - Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!

दरम्यान, इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.