राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ, ५४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये आज एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

Updated: May 13, 2020, 08:51 PM IST
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ, ५४ जणांचा मृत्यू title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये आज एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. एका दिवसामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १,४९५नी वाढली आहे, तर ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या २५,९१२ वर पोहोचली आहे, तर आत्तापर्यंत ९७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे ८०० रुग्ण वाढले असून दिवसभरात ४० जणांना जीव गमवावा लागला आहे.

आजच्या एका दिवसात कोरोनातून बरे झालेल्या ४२२ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाचे ५,५४७ रुग्ण बरे झाले आहेत.

आज झालेल्या ५४ मृत्यूंपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत, तर २१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्याची आकडेवारी (कंसात मृत्यू)

मुंबई महानगरपालिका: १५,७४७ (५९६)

ठाणे: १५७ (३) 
ठाणे मनपा: ११२२ (११)
नवी मुंबई मनपा: १०१८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४१२ (३)
उल्हासनगर मनपा: ७२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४५ (२)
पालघर: ४० (२)
वसई विरार मनपा: २८६ (११)
रायगड: १५८ (२)
पनवेल मनपा: १५० (८)
ठाणे मंडळ एकूण: १९,४४६ (६४४)

नाशिक: ८८
नाशिक मनपा: ४६
मालेगाव मनपा:  ६१७ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ६२ (३)
जळगाव: १६२ (१७)
जळगाव मनपा: ४४ (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १११४ (७१)

पुणे: १८० (५)
पुणे मनपा: २८३० (१६१)
पिंपरी चिंचवड मनपा: १५१ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: ३११ (२१)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३६०६ (१९३)

कोल्हापूर: १६ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३५
सांगली मिरज कुपवाड मनपा: ६ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ६० (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १३० (५)

औरंगाबाद:९४
औरंगाबाद मनपा: ५८६ (१७)
जालना: १६
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७५९ (१८)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १७४ (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४०८ (२६)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३१५ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३२४ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २५ हजार ९२२  (९७५)