Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!

ST Seasonal fare Cancelled: निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Oct 14, 2024, 02:36 PM IST
Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!  title=
एसटी भाडेवाढ

ST Seasonal fare Cancelled: विधानसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून अनेक लोकाभिमूख निर्णय घेण्यात येत आहेतय नुकतेच सरकारकडून हलक्या वाहनांसाठी 5 टोलनाक्यांवरील टोल माफ करण्यात आले आहेत. दरम्यान एसडी भाडेवाढीसंदर्भातदेखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दर दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ एसटीकडून रद्द करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात एसटी भाड्यात वाढ करण्यात येते. पण यावेळेस होणारी भाडेवाढ रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच एसटी महामंडळाकडून महिलांना प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यात ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसडी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतलाय.

एअर होस्टेसच्या धर्तीवर `शिवनेरी सुंदरी´

पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी´ नेमणार आहे. 

लालपरीच्या ताफ्यात  2500 गाड्या दाखल होणार

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 बसगाड्या आहेत. त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.  त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.