Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 :  विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 

Updated: Mar 15, 2023, 01:40 PM IST
Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर title=

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्र्यांच्या उपस्थितीवर सरकार अडचणीत आले. आज लक्षवेधीसाठी घेतलेल्या विशेष कामकाजावेळी विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली. सभागृहात आमदारांकडून याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि तालिकाअध्यक्ष संजय शिरसाट यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला धारेवर धरलं. तर मंत्र्यांना याबाबत समज दिली जाईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. बजेटविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.. शिंदे-फडणवीस सरकारने डोंगर पोखरुन उंदीर बाहेर काढल्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. 

विधानसभेत बोलू दिले जात नाही, मग शेतकऱ्यांचा प्रश्न ..

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटणदेवी इथे येऊन शेतकरी शिष्टमंडळाशी चर्चा करावी अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केलीय. शेतकऱ्यांचा मोर्चा सध्या घाटणदेवीत थांबलाय. तिथे मुख्यमंत्री आले नाही तर मुंबई कोणत्याही क्षणी बंद करु असा इशारा त्यांनी दिला. सभागृहामध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार कसा असा प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केलाय. सरकारने चर्चेसाठी शिष्टमंडळाला आज तीन वाजताची वेळ दिलीय. विधानभवनात ही बैठक होणार आहे.

विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ  

विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थितीत का राहतात भाजप आमदार कालिदास कोळमकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित आहे. इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र शब्दात नाराजी केली. सभागृहात उपस्थित सदस्यांची जी भावना आहे तीच नाराजीची भावना आपली देखील असल्यास तालिका अध्यक्षांनी मत व्यक्त केले.

रोहित पवार यांनीही धरले सरकारला धारेवर 

याबाबत विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला धारेवर धरले.  कालच्या सत्रात अनेक मंत्री उपस्थित नव्हते आज ही तीच परिस्थिती आहे. जर मंत्री सकाळी लवकर येत नाहीत तर ते करतात काय? असा सवाल केला. आज लक्षवेधी साठी विषेश सभागृह बोलण्यात आले होते ते देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 

भाजप सरकार असताना अनेक खासगी पध्द्तीने काम दिली होतीत. एकीकडे 75 हजार भरती करणार आहे असे सांगत आहेत. त्याच्या जाहिरात कुठे आहेत. बजेटमध्ये देखील हवेत घोषणा केल्या आहेत, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.