Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटका

महाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण मांडले आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 23, 2024, 04:32 PM IST
Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटका title=

Maharashtra Band :  बदलापूर अत्याचार घटनेनंतर राज्याचे राजकारण चांगलचे तापले आहे.  महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे.  मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी जबरदस्त झटका दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही अशी टिपण्णी कोर्टाने केली आहे.  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही
जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. 

कोर्टाने बंद करता येणार नाही असे सांगूनही विरोधक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहात. बंदबाबत हायकोर्टाने विरोधकांना चपराक दिली आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 

विरोधकांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे. कुणालाही अश्याप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं सरकारकडून सांगण्यता आलंय.. बंद करणा-या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सरकारकडून हाय कोर्टाला सांगण्यता आलंय..  उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्तेसह   इतरांनी याचिका दाखल केलीय... त्याविरोधात सुनावणी सुरू आहे.. 

डॉ. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका दाखल केली आहे.  महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. 

उद्याचा बंद जनतेचा उद्रेक आणि राग व्यक्त करण्यासाठी आहे. नागरिकांनी शांततेनं बंद पाळावं, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय.. बदलापूर अत्याचार प्रकरणी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. यावरून आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारचा समाचार घेतलाय. हा बंद संस्कृती विरुद्ध विकृती असल्याचंही उद्धव टाकरेंनी म्हटलंय. तर सरकारनं उद्याच्या बंदवेळी जनतेला जेलमध्ये टाकून दाखवावं, असं आव्हान नाना पटोले यांनी केलंय.