बडनेरा : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात हाणामारी झाली. आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात शाब्दीक वाद झाला. या वादातं रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झालं. यामुळे परिसरात गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बडनेऱ्यातल्या वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र आले होते. त्यावेळी यांच्यामध्ये सुरुवातीस शाब्दीक बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. खासदार नवनीत राणा यांना दिनेश बुब यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला आहे.
असे असले तरीही यासंदर्भात कोणतीही पोलीस तक्रार अद्याप नोंद करण्यात आली नाही. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.