Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा...   

सायली पाटील | Updated: Dec 9, 2024, 12:49 PM IST
Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर title=
Maharashtra Assembly special session dcm eknath shinde congratulates rahul narvekar and targets opposition nana patole creats laughter video

Maharashtra Vidhansabha Video : सोमवारी राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी नव्यानं अध्यक्षांची निवड करण्यात आली. कुलाबा मतदारसंघातून बहुसंख्य मतांनी विजयी झालेल्या राहुल नार्वेकर यांची यावेळी सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि सत्ताधाऱ्यांनी नार्वेकरांना शुभेच्छा देत त्यांच्या कारकिर्दीता आढावा सभागृहापुढं मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यामागोमाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नार्वेकरांना शुभेच्छा दिल्या. 

सभागृहाच्या या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं गाजले ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा फिल्मी अंदाज. 'विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं आव्हान होतं. पण, त्यांना मतदारांनीच घरी बसवल्यामुळं दुसरं कोणी तुमच्यापुढे उभं राहायलाच तयार नाही' असं म्हणताना शिंदेंनी 'नाना बरोबर ना?', असा मिश्किल सवाल भर सभागृहात केला. 

'...म्हणून मी नाना पटोलेंचे आभार मानतो. कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. मग ती गाडी अशी...' आपलं वाक्य लांबवत, 'याचं क्रेडिट नाना तुम्हालाच आहे. किती नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आणि आम्ही हे खरं मानतो. त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काही बोलत असतील ते जाऊद्या. पण, नाना ना ना म्हणत असले तरी त्यांचं आमच्यावर प्रेम आहे..... सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको?' असं शिंदे म्हणताच नानांनाही हसू आवरलं नाही. 

'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे... त्यामुळे आम्ही मूळ विसरत नाही' असं म्हणत सभागृहात शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धमाल फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

हेसुद्धा वाचा : Video : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुकी, आक्रोश अन्... 

'अध्यक्ष पुन्हा येईल म्हणाले नव्हते तरी ते पुन्हा आले. आम्ही 200 हुन अधिक आमदार निवडून आणू म्हणालो होतो, अन्यथा मी शेतकरी निवडून आणू म्हणालो होतो, तो शब्द आम्ही खरा केला. अजितदादा सोबत आले म्हणून त्यात बोनस add झाला', असंही शिंदेंनी आपल्या निवेदनाच्या सुरुवातीलाच म्हणत उपस्थितांचं लक्ष वेधलं. या संपूर्ण सत्रामध्ये 'कर नाही त्याला कशाला डर, त्याचं नाव राहुल नार्वेकर' अशा त्यांच्या काव्यात्मक वक्यव्यांनाही विधानसभा सदस्यांची दाद मिळाली.