‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’

Sanjay Raut on Amit Shah Meet: आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसवण्यात मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 21, 2024, 03:44 PM IST
‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’ title=

Sanjay Raut on Amit Shah Meet: भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावलं आहे. तसंच या बातम्या जाणुनबुजून पेरल्या जात असून, अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिनाशी तडजोड करणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी कऱणार नाही असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अमित शाह यांची भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसवण्यात मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. शिवसेना कधीही अशा ताकदींसमोर झुकणार नाही, हात मिळवणार नाही. जे लोक या देशाचं संविधान संपवू इच्छित आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणार नाही”.

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी

“काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर मला त्याचंही आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सर्वात जास्त संघर्ष शिवसेनेने केला आहे. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, चिन्ह चोरलं आणि महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला. जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे औलाद नाहीत. मग ते कोणयाही पक्षाचे असावेत. एकतर त्यांनी बाप दाखवावा किंवा श्राद्ध घालावं,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 
 

मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार

“स्वतच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोंडे उडवणार हे लोक आहेत. याला गांडुगिरी म्हणतात. जर अशा अफवा पसरवून लढणार असतील तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. या सुपाऱ्या देणाऱ्यांची वित्तंबातमी आमच्याकडे आहे. आमचीही यंत्रणा आहे.  एक वेगळं पेगॅसस आमच्याकडे आहे.  कोण कोणाला बातम्या पुरवतं. अफवा पसवण्यात मदत करतो ही सगळी माहिती आमच्याकडे आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 

पुढे ते म्हणाले की, “मी ठामपणे सांगतो की शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिनाशी तडजोड करणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभामिन पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी कऱणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणझे अफजल, औरंगजेबाशी हातमिळवणी करण्यासारखं आहे”.