Exclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. 

नेहा चौधरी | Updated: Nov 9, 2024, 12:12 PM IST
Exclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र title=
Ajit Pawar on Supriya Sule means nautanki Exclusive Interview

Ajit Pawar on Supriya Sule : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra assembly election) महासंग्राम दिवसेंदिवस रंगत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दिवाळीनंतर प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय नेते मैदानात उतरले आहेत. अशात एकमेकांवर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी धाडल्या जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Exclusive Interview) यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुप्रिया सुळे नौंटकी असाचं म्हटलंय. 

'झी 24 तास' ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट बहीण सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, अजित पवारांच्या या विधानानंतर त्यांना आर आर पाटील यांच्या कुटुंबाची माफी मागावी लागली. याबद्दल अजित पवार यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं ते तर म्हणाले की, 'अरे बापरे बापरे...फारच माफी मागावी लागली...ही तर सगळी नौटंकी आहे. याला काही महत्त्व नाही.'

'कुटुंब एकत्र आणण्यासाठी समोरून पावलं उचलली जात नाहीत!'

कुटुंब एकत्र आणण्यासाठी समोरून पावलं उचलली जात नाहीत, असं वक्तव्य अजित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केलंय. दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले तर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं. मात्र, समोरून प्रयत्न होत नाही, उलट ते वाढवण्याचं काम होतंय, असंही अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर एकत्र कुटुंबासंदर्भात विचार करू, सध्या तसा विचार केला नसल्याचं ते म्हणालेत. 

काट्यानं काटा काढण्याचा हा प्रकार - अजित पवार

लोकसभेत पत्नी सुनेत्राला सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं. त्यामुळे त्यांनी आता विधानसभेला पुतण्याला माझ्या विरोधात उभं केलं. म्हणजे काट्याने काटा काढण्याचा हा प्रकार असू शकतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय.