'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.

Updated: Oct 21, 2024, 11:33 AM IST
'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले   title=
Maharashtra Assembly Election 2024 bjp shrigonda party members disputes over not getting ticket for vidhansabha Election

लैलेश बारगजे, झी मीडिया, श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच भाजपकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. ज्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेगही आला. (Maharashtra Assembly Election 2024)

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. 

'मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी दिली. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे' असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. 

हेसुद्धा वाचा : अजबच! मुख्यमंत्री म्हणे, 'जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला'! आर्थिक मोबदल्यासहीत कैक सुविधांचे लाभार्थी होण्याची संधी

सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवल खरं. मात्र भाजपचं पक्ष चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांचा कंठ दाटून आल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. तसंच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला.