नागपुरात कोविड रुग्णालायाला मोठी आग, चार जणांचा मृत्यू

नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये आगीत 4 जणांचा मृत्यू झाला.(Fire Broke Out In Nagpur Covid Hospital)  

Updated: Apr 10, 2021, 08:46 AM IST
नागपुरात कोविड रुग्णालायाला मोठी आग, चार जणांचा मृत्यू title=
ANI

मुंबई : नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये आगीत 4 जणांचा मृत्यू झाला (Fire Broke Out In Nagpur Covid Hospital) असून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला केला आहे. (PM Narendra Modi Express Condolences) नागपुरातील रुग्णालयात शुक्रवारी आगी रात्री अचानक आग लागली. शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

काल रात्री 8.10 वाजता लागलेल्या आगीत काही लोक जखमी झाल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या रुग्णालयातून सुमारे 27 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी काही सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीनंतर रुग्णालय खाली करण्या येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्टिट केले आहे, 'नागपूर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे मी दु: खी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल माझ्या संवेदना आहेत. या घटनेत जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. '

नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश यांनी सांगितले की, रुग्णालयात तीन मृतदेह मिळाले आहेत. मदत कार्य चालू आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, नागपूर महानगरपालिकेचे (एनएमसी) मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील आयसीयू जवळील एसी युनिटमध्ये आग लागली. कालांतराने आगीवर नियंत्रण मिळवले. दुसर्‍या मजल्यावर आग पसरु दिलेली नाही.