सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार

Lumpy skin disease: राज्यात लम्पी आजाराने (Lumpy skin disease) राज्य सरकार आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. आता राज्यात पशूधनाचं लसीकरण होणार आहे. 

Updated: Sep 16, 2022, 12:45 PM IST
 सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार  title=

मुंबई : Lumpy skin disease: राज्यात लम्पी आजाराने (Lumpy skin disease) राज्य सरकार आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अनेक जनावरांना लम्पी रोगाने हैराण केले आहे. जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यावर उपाय काय करायचा, हा शेतकऱ्यापुढे प्रश्न होता आहे. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार आहे. (Lumpy skin disease, Maharashtra starts vaccination)

लम्पीने राज्याची काळजी वाढवली असताना सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार आहे. 5 किलोमीटर परिघाची मर्यादा सरकारने हटवली आहे. लसीकरण आणि औषधपाण्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार नाही. शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी उपाययोजना राबवण्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या वाढत्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

लम्पी रोगनियंत्रणासाठी टास्कफोर्स स्थापन करण्यात आला आ हे. जनावरांना वाचवण्यासाठी आता लसीकरणावर भर दिला जात आहे.  राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केला आहे. त्यात पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सुक्ष्मजीवशास्त्र, आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 14 सप्टेंबपर्यंत राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

Lumpy skin disease जनावरांचा त्वचा रोग देशभरात जीवघेणापणे पसरत आहे आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, प्राणघातक विषाणूमुळे 67000 जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील रोगाच्या स्थितीबाबत काही आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे आणि माहिती दिली आहे की एकूण 21 बाधित जिल्ह्यांमध्ये आता 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्याने लसीकरण मोहीम सुरू केली आहे आणि या विषाणूचा राज्यातील दूध उत्पादनावर परिणाम दिसून आलेला नाही. मात्र, जनावरांची अधिक काळजी घेण्यासाठी ही लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.