सातारा: लोणावळा शहर आणि परिसरात तसेच, पवन मावळ भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा वाढत आहे.
पाणीपातळी वाढ झाल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून ४५३७ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये करण्यात येत आहे. यामुळे पवना नदीवर असलेला शिवली पूल पाण्याखाली गेला असून यामुळे शिवली, भडवली, येलघोल, धनगव्हान या गावाचा येळसे मार्गी जाणारा रस्ता बंद झाला असून या गावांचा संपर्क तुटला आहे.
नदीकाटच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.