लोणावळ्यातल्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

लोणावळ्यातील सार्थक वाकचौरे आणि श्रृती डुंबरे हत्या प्रकरणाचं गूढ दोन महिन्यांनंतर उकललं आहे.

Updated: Jun 11, 2017, 04:50 PM IST
लोणावळ्यातल्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं title=

लोणावळा : लोणावळ्यातील सार्थक वाकचौरे आणि श्रृती डुंबरे हत्या प्रकरणाचं गूढ दोन महिन्यांनंतर उकललं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आसिफ शेख आणि सलीम शेख अशी आहेत. दोघंही नशेखोर असून किरकोळ पैशांसाठी ही हत्या करण्यात आल्याची कबूली आरोपींनी दिल्याचं समजतंय.

लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर आयएनएस शिवाजी केंद्राजवळ मृतदेह आढळले होते. या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ७ अधिका-यांसह 25 कर्मचारी या तपास पथकात सहभागी झाले होते.

याप्रकरणी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली गेलो. त्यासोबतच या खुनासंदर्भात पोलीसांना माहिती देणा-यास 50 हजार रुपयांचे बक्षीस ही जाहीर करण्यात आले होते. वेगवेगळ्या स्तरावर करण्यात आलेल्या या तपासात खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली होती.