यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर

वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे यवतमाळ कहर माजला आहे. या पावसाचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. या पावसानं फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत. दारव्हा तालुक्यातल्या दत्तापूर निळोणामध्ये प्रवीण गायकी यांची 2 एकरावरची केळीची बाग पूर्णत: उद्धवस्थ झाली आहे.

Updated: Jun 11, 2017, 04:30 PM IST
यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर  title=

यवतमाळ : वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे यवतमाळ कहर माजला आहे. या पावसाचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. या पावसानं फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत. दारव्हा तालुक्यातल्या दत्तापूर निळोणामध्ये प्रवीण गायकी यांची 2 एकरावरची केळीची बाग पूर्णत: उद्धवस्थ झाली आहे.

पारंपरिक पिकांना फाटा देत गायकी यांनी सुमारे 2 लाखांचा खर्च केला आणि केळीचं पिक घेतलं पण केळी विक्रीला आली आणि पावसानं घात केला. असा घात झालेले यवतमाळमध्ये प्रविण एकटेच नाहीत. तर अनेक गावांमध्ये या पावसानं शेतक-यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.