Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?   

Updated: Mar 26, 2024, 07:03 AM IST
Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या  title=
Loksabha election 2024 baramati Connstituency Sunetra pawar Supriya Sule a family clash in political ground latestg update

जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : (Loksabha Election 2024)मागील अनेक वर्षांपासून म्हणजेच, गेली सहा दशकं बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण राज्यात लागू आहे. आता मात्र हे समीकरण बदलण्यासाठी पूर्ण धडपड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? (Baramati Loksabha) 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी भाजपबरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे घेत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि बारामतीत काका पुतण्याची ताकद किती याच्याच अंदाज घेणे सुरू झाले. अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार? 

शरद पवार आणि बारामतीचे समीकरण (Sharad Pawar and Baramati Loksabha)

बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती असे समीकरण गेली सहा दशके राज्यात चर्चेत आहे. मात्र गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला. परंतू अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठिमागे उभे राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधला असताना अजित पवारांचे बंड आणि पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह मतदार लोकसभा मतदारसंघात देखील मोठी विकासकामे केले आहे. त्यामुळेच मी दौंडला आले आहे बाकी तुम्ही समजून घ्या असे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या आहेत. सुनेत्रा पवारांचं हे सूचक वक्तव्य मतरादारांना नेमके काय सांगू पाहत आहे याचा अंदाज आतापर्यंत अनेकांनाच आला आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघाचे 6 मतदार संघ येतात. यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला असे सहा विधनसभा मतदार संघांचा समावेश आहे. इथं यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. 

सुप्रिया सुळेंसाठी नेमका धोका कुठे? 

(NCP) राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे बारामतीहुन अजित पवार आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणे , काँग्रेस पक्षाचे भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप भाजपचे दौंडचे राहुल कुल आणि खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तापकीर असे आमदार आहेत. दौंड तालुक्यामध्ये भाजपची ताकद ही जास्त असून तेथील विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला होता, मात्र अजित पवारांची जर ताकद वाढली तर दौंड मतदार संघात भाजप शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटाचे वर्चस्व राहणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या फळीतील नेते रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केल्याने सुप्रिया सुळे यांना या तालुक्यात धोक्याची घंटा निर्माण होईल. 

इंदापूर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते कारण, लोकसभेच्या येथून पाठीमागे झालेल्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना भक्कम पाठिंबा दिला होता. मात्र आता हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आल्याने त्यांचा पाठिंबा सुळे यांना मिळणार नसून या ठिकाणी शिंदे गट भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विधानसभेला पारडे जड होणार? आहे तर सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात धोक्याची घंटा निर्माण होईल. मात्र लोकसभेला हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. 

हेसुद्धा वाचा : Solapur LokSabha : प्रणिती शिंदे काढणार वडिलांच्या पराभवाचं उट्टं? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक?

पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. मात्र या पराभवात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता. अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जाहीर केले होते की विधानसभेला विजय शिवतारे कसे निवडून येतात तेच पाहतो, आणि अजित पवारांनी पूर्ण ताकद लावून पुरंदर हवेली मतदारसंघात विजय शिवतारे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना निवडून आणले. मात्र आता विजय शिवतारे हे शिंदे गटाकडे गेले असल्याने अजित पवार शिंदे गट आणि भाजपाने या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली तर या ठिकाणी विजय शिवतारे यांचे पारडे जड होणार आहे. परिणामी इथंही सुप्रिया सुळे यांना धोक्याची घंटा निर्माण होणार? 

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार महाराष्ट्रातून एक नंबर ने विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. तर सुप्रिया सुळे यांनाही बारामतीतून विक्रमी मतदान मिळाले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले खरे. मात्र आता अजित पवार शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर अजित पवार यांचे मताधिक्य आणखीन वाढणार आहे.  

अजित पवारांच्य बंडामुळे सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकी ही अवघड जाणार हे स्पष्ट. दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर स्वत: अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करतील तर संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतील का? याबाबत शंका आहे. कारण आमदार संजय जगताप हे अजित पवारांमूळ निवडून आले आहे. तर संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या दुफळीमुळे राज्यात, जिल्ह्यात आणि गावागावात राष्ट्रवादी काँगेसमध्ये फूट पडली आहे आपले काय असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकारऱ्यांना पडला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील सुप्रिया सुळे यांचे लोकसभा निवडणुकीत काय होणार? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे