मावळ : मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणून पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मावळच्या मतदारांनी पार्थ यांना नाकारले आहे. शेकापची राष्ट्रवादीला मदत मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांना यांना येथे आणखी फायदा होऊ शकतो असे मानले जात होते पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. पार्थ पवारांच्या विरोधात शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर बहुजन वंचित आघाडीने येथून राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली होती.
12:43 PM - मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे 1 लाख 55 हजार मतांनी आघाडीवर
12:09 PM- मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार 1 लाख 42 हजार मतांनी पिछाडीवर
11:26 AM- मावळमध्ये पार्थ पवार 1 लाख 81 हजार मतांनी पिछाडीवर
10:54 AM - मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार 80 हजार मतांनी पिछाडीवर
10:22 AM- शिवसनेचे श्रीरंग बारणे 59 हजार 995 मतांनी आघाडीवर
10:06 AM- पार्थ पवार 46 हजार मतांनी पिछाडीवर
9:38 AM- पार्थ पवार 4 हजार मतांनी पिछाडीवर
अजित पवार, पार्थ पवार पुण्यातील घरी. चित्र स्पष्ट झाल्यानंतरच बोलणार. मी तिथे जाऊन थांबतोय.
9:21Am- पार्थ पवार 9000 मतांनी पिछाडीवर
9:06AM- मावळ - पार्थ पवार पुढे पार्थ पवार - ३०८३२ श्रीरंग बारणे - २८८०६
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा मोठा पराभव झाला होता. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल ५ लाख १२ हजार २२६ मतांनी विजयी झाले होते.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
श्रीरंग बारणे | भाजप | 569825 |
लक्ष्मण जगताप | अपक्ष, शेकाप-मनसे पाठिंबा | 254056 |
राहुल नार्वेकर | राष्ट्रवादी | 93502 |
मारुती भापकर | आप | 28657 |
भिमापुत्र गायकवाड | बसपा | 14727 |