लोकसभा निवडणूक २०१९ : नांदेड मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 31, 2019, 04:54 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : नांदेड मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसनं त्यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे अशोक चव्हाणांच्या विरोधात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ साली नांदेडच्या मतदारसंघातून अशोक चव्हाण विजयी झाले होते. राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या २ जागांपैकी ही एक जागा होती. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या डी.बी. पाटील यांचा ८१,४५५ मतांनी पराभव केला होता. 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी 

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

अशोक चव्हाण काँग्रेस ४,९३,०७५
डी.बी.पाटील भाजप ४,११,६२०
राजरत्न आंबेडकर बीएमयुपी २८,४४७
हंसराज वैद्य बसपा २२,८०९
फिरोज खान गाझी अपक्ष ८,०८८

काय आहेत नांदेडच्या समस्या? पाहण्यासाठी क्लिक करा

रणसंग्राम । आवाज तरुणांचा । नांदेडमधील तरुणांना काय वाटते?

रणसंग्राम । नांदेडमधील मतदारांच्या मनात काय?