औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांचं आव्हान असेल. तर औरंगाबाद मतदारसंघातून एमआयएमने आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे.
२०१४ साली या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विजयी झाले होते. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा १,६२,००० मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
चंद्रकांत खैरे | शिवसेना | ५,२०,९०२ |
नितीन पाटील | काँग्रेस | ३,५८,९०२ |
इंद्रकुमार जेवरीकर | बसपा | ३७,४१९ |
सुभाष लोमटे | आप | ११,९७४ |
नोटा | ६,३७२ |