Loksabha Elections 2019: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, तिसऱ्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

Updated: Apr 21, 2019, 06:38 PM IST
Loksabha Elections 2019: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, तिसऱ्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यातच रविवार आल्यामुळे प्रचाराचा धडाका उडाला. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रचार केला. देशात २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात एकूण १४ राज्यात एकूण ११५ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी राज्यात १४ मतदारसंघात मतदान होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

तर देशात तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमन दीव या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत.

तिसऱ्या टप्प्यात हे दिग्गज मैदानात

तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज मैदानात आहेत. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच रक्षा खडसे, चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, सुनिल तटकरे, निलेश राणे, गिरीश बापट, सुजय विखे पाटील, राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

१४ मतदारसंघातल्या लढती

जळगाव 

रावेर

औरंगाबाद

जालना

रायगड

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

पुणे

बारामती

सांगली

सातारा

माढा

कोल्हापूर

हातकणंगले

अहमदनगर