मुंबई : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. असं असताना सरकारने 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी केली. मात्र राज्यात संचारबंदी लावूनही लोकं नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत. त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
कोविड १९ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं आहे. राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात संचारबंदी लावूनही लोकं नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत. त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची लावले जाणार आहेत.
Maharashtra: In a video, #COVID19 patients seen sharing beds at Govt Medical College, Nagpur. Medical Superintendent says, "It generally doesn't happen. It's a 900-bed hospital. Patients come from neighbouring districts & state. So it's important to give them oxygen quickly." pic.twitter.com/pI0od9OoKr
— ANI (@ANI) April 15, 2021
कोविड १९ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी त्याचा परिणाम मुंबईतील अनेक भागात दिसत नसल्याचं चित्र आहे. मागील वर्षी कोरोनामुळे वरळी कोळीवाडा दहशतीच्या छायेखाली होता. कोरोनाच्या दुसर्या लाटेतही वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येतायत. मात्र याच वरळी कोळीवाड्यात संचारबंदीचा कोणताच परिणाम दिसून येत नाही.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15 ते 30 एप्रिल दरम्यान राज्यात संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आली आहे