Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

Maharashtra Live Updated News: राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभराच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

13 Sep 2024, 10:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट

बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे तसेच सोबत बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांचा मद्यपान केल्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जुन हावरे चे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये शंभर मिलिलिटर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 28 मिलिग्रॅम एवढे आले आहे..

13 Sep 2024, 10:00 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : वैनगंगा नदीच्या पुरात एक 100 टन वजनाची क्रेन वाहून गेली

भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेला आंभोरा केबल ब्रीज आणि गोसेखुर्द धरण थोडक्यात वाचलंय... वैनगंगा नदीच्या पुरात एक 100 टन वजनाची क्रेन वाहून गेली..  कोरंभी जवळ नविन पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणली होती.. मात्र आंभोरा ब्रीजपासून काही अंतरावरच ही क्रेन अडवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.. जर ही क्रेन ब्रीजला किंवा गोसेखुर्द धरणाला धडकली असती तर ब्रीजचंही नुकसान झालं असतं तसंच गोसेखुर्द धरणाचंही मोठं नुकसान झालं असतं..

 

13 Sep 2024, 09:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अनंत चतुर्दशीला भाविकांसाठी रेल्वेचा खास निर्णय

अनंत चतुर्दशीला मुंबई लोकल रात्रभर सुरू राहणार आहे. तर रात्री अधिकच्या लोकलच्या 8 फेऱ्या असणार आहे.. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील.

13 Sep 2024, 09:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वे गाड्या 

कोकणातून परतणा-या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय. 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान 20 डब्यांच्या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. सीएसएमटी ते खेड आणि पनवेल ते खेड दरम्यान या विशेष गाड्या धावतील. 
खेड ते सी एस एम टी(1 फेरी)
16 सप्टेंबर सकाळी 6 वाजता सुटेल
पनवेल - खेड (3 फेऱ्या) 13, 14 आणि 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता आणि रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी सुटेल

13 Sep 2024, 09:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात होणारेय. मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणात अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आलीय. यासंदर्भात आता सुप्रीम कोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावर आज कोर्ट निकाल देणारेय.

13 Sep 2024, 09:50 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय. 15 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारेय. त्यामुळे एक महिन्यानंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल पूर्ण होण्याची शक्यता मावळलीये. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढं ढकललीय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 21 ऑक्टोबरला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात 12 नोव्हेंबरला सुनावणी होणारेय. त्यामुळे विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षाचं नाव आणि चिन्हाचा निकाल लागण्याची शक्यता मावळीय. 

13 Sep 2024, 09:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : राहुल गांधींच्या आरक्षणाबाबच्या विधानाचा भाजपकडून आज राज्यभर आंदोलन

आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झालीये.. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करणार आहे...काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओचा नारा देत भाजपनं हे आंदोलन पुकारलंय... भाजपचे मुख्य नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे मुंबईत आंदोलन करणार आहेत.. भाजपचे अन्य नेतेही जिल्हानिहाय आंदोलनात सहभागी होणार आहेत.. सकाळी 10 वाजता मुंबईत आशिष शेलार राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानाचा आंदोलन करून निषेध कऱणार आहे..  

13 Sep 2024, 09:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा 

खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होत नाही... राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असे दोनच साहेब आहेत, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. खेड इथल्या सभेत बोलताना अजित पवारांनी आता कुणाला विचारावं लागत नाही आपणच साहेब असल्याचं विधान केलं होतं. त्याचा समाचार अमोल कोल्हेंनी घेतलाय.. 

13 Sep 2024, 09:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'मालवणमध्ये शिवराय पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार'

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या ठिकाणी, नव्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ही माहिती दिली. यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवल्याचं केसरकरांनी सांगितलं. एकंदरीत राज्य सरकारच्या वतीनं शिवरायांचा पुतळाप्रकरणी, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येतंय. 

 

13 Sep 2024, 09:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक आजपासून खुला

कोस्टल रोड आणि वांद्रे सी-लिंकला जोडणारा कोस्टल रोडवरील पूल आजपासून प्रवासासाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काल कोस्टल रोडला जोडणाऱ्या पूलाचं उदघाटनं पार पडलं होतं.. त्यानंतर पूल मुंबईकरांसाठी खुला झालाय..  या मार्गामुळे आता मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्याला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटकाही होणार आहे..