Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

Maharashtra Live Updated News: राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभराच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

13 Sep 2024, 15:44 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE : हिंगोलीत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करत हिंगोली येथे भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध  व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होतेय. दरम्यान यावेळी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

13 Sep 2024, 15:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आज शेतकरी यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शंभर ते दोनशे शेतकरी युवकांनी पुढाकार घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात न घेता किंवा राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची मदत न घेता शेतकरी एल्गार मोर्चाचे आयोजन केलेय. या मोर्चामध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये भाव, कापसाला 12 हजार रुपये भाव, सरसकट कर्जमाफी जीएसटी मुक्त शेती उपयोगी साहित्य , शेतीला अनुदानावर तारकुंपण , शेतीला 24 तास वीज अशा सुमारे आठ प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आलेय. तर सरकार शेतकऱ्यांची शेती हे भांडवलदारांच्या घशात टाकत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय.

13 Sep 2024, 15:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये सहा जणांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र राज्य सरकारकडून आंदोलनाची गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याने धनगर समाजातील कार्यकर्ता विश्रांती भूसनर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याची घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भंडारा उधळण्यात आला. काही वेळाने पोलिसांनी समजूत काढून आंदोलनकर्त्यांना खाली उतरवले.

13 Sep 2024, 13:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : गणेशोत्सवात मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी

गणेशोत्सवात मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी... मुंबईच्या डबेवाल्यांन आता मुंबईतच घर मिळणार आहे.. पीएम आवास योजनेतून आता डबेवाल्यांना घरं दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डबेवाल्यांची संघटना यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली.. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची घोषणा केली.. डबेवाल्यांसाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती होणार आहे.. यात चर्मकार समाजातील बांधवांसाठी सुद्धा घरे असतील.. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी दिली जाणार आहे.. नमन बिल्डर यांच्या मार्फत ना नफा ना तोटा तत्वावर ही घरं बांधली जाणार आहेत.. 500 चौरस फुटांची अशी एकूण  12 हजार घरं या प्रकल्पात उभारण्यात येतील. 25 लाखात हे घर दिलं जाईल.. पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.. 

 

13 Sep 2024, 13:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात काँग्रेसचं भाजपविरोधात आंदोलन

एकीकडे भाजपचं राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानाविरोधत भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजपविरोधात आंदोलन केलंय... राहुल गांधींना जीवे धमकी देणाऱ्या भाजप नेते रविंदरसिंग मारवा यांच्याविरोधात आंदोलन काँग्रेस नेत्यांनी केलंय.  शहराध्यक्ष विकास ठाकरे  यांच्या नेतृत्वात  महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं..यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी व्हेरायटी चौकात वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल..

 

13 Sep 2024, 13:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : महायुतीत 70-75 टक्के जागांवर एकमत झालंय - बावनकुळे

महायुतीत 70-75 टक्के जागांवर एकमत झालंय, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. ज्या जागा जिंकणार नाही, असं वाटत असेल तर त्या ठिकाणी महायुतीतील दुस-या पक्षाचा नवा मजबूत उमेदवार देऊ, असं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यामुळे विद्यमान आमदारांचेही तिकिटं कापण्याचे संकेत बावनकुळेंनी दिलेत. त्यामुळे आता कोणता उमेदवार बदलणार, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे.

 

13 Sep 2024, 12:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट 

मंत्री शंभूराज देसाई, अंबादास दानवेंनी गळाभेट घेतलीय. दोन्ही नेते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात एकत्र आले. यावेळी त्यांनी एकमेकांची गळाभेट गेतली. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र, देवाच्या दारात राजकारण नको, अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिलीय.

 

13 Sep 2024, 12:10 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : माढा लोकसभेनंतर आता विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एन्ट्री 

माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एन्ट्री होणारेय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायेत. शिवतेजसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील, अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदेंना शिवतेजसिंहांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

 

13 Sep 2024, 12:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक 

आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झालीये.. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपनं राज्यभर आंदोलन सुरु केलंय.. काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओचा नारा देत भाजपनं हे आंदोलन पुकारलंय... अकोल्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे या आंदोलनात सहभागी झालेत.. तर मुंबईत आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. नाशिक आणि संभाजीनगरमध्येही आंदोलन सुरु आहे.. 

 

13 Sep 2024, 11:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : लाडक्या बहिणींच्या पैशांवर भावांचा डल्ला!

संभाजीनगरमध्ये 12 जणांनी लाडकी बहीण योजनेत महिलांचे फोटो लावून पुरुषांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आलाय. कन्नड तालुक्यात हा प्रकार घडलाय. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्टला पडताळणी केली असता हा प्रकार समोर आलाय. पोर्टलवर आधार कार्ड स्वतःच्या नावाचा अपलोड केला. तर हमीपत्रही स्वतःच्याच नावानं भरला. मात्र, फोटो इतर महिलांचे अपलोड केले. दरम्यान या प्रकरणीची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत.