Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

Maharashtra Live Updated News: राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभराच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

13 Sep 2024, 20:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचे उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. 

13 Sep 2024, 20:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लालबागच्या राजासह चिंचपोकळीचा चिंतामणी आणि वांद्र्यातील आशिष शेलार यांच्या गणरायाचे ते दर्शन घेणार आहेत. यावेळी ते काही भाजप नेत्यांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे. 

13 Sep 2024, 19:19 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील : प्रशांत पडोळे

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं विधान खासदार प्रशांत पडोळे यांनी गोंदियातल्या सभेत केलं आहे. 

13 Sep 2024, 18:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 177 दिवसानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी 177 दिवसानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. 

13 Sep 2024, 17:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : कर्जत विधानसभेच्या जागेवर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरती आता थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दावा केलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगली जुंपणार आहे. सुतारवाडी येथील गीताबाग या आपल्या निवासस्थानी सुनील तटकरे यांनी घेतलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट करीत ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या गोटातून आनंद व्यक्त होत आहे. 

13 Sep 2024, 17:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद

दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून रात्रीच्या दरम्यान बिबट्याने अतुल शिंदे यांच्या घरच्या श्वानावर हल्ला केला असून जखमी श्वानाला बिबट्या घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा सारखा वावर असल्याने अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. 

13 Sep 2024, 17:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : खासदार विशाल पाटलांचा यू टर्न! आता म्हणाले रोहित पाटलांना आमदार करणार

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आता रोहित आर आर पाटलांच्या आमदारकीसाठी शब्द दिलाय. वसंतदादा घराणे आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील असेल असं त्यांनी जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा तयारीत असणारे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता खासदार विशाल पाटलांनी रोहित आर आर पाटील यांच्यावतीन आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पाटलांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचा पुढचा आमदार रोहित आर आर पाटील असणार असल्याचं स्पष्ट केलंय. काही दिवसात खासदार विशाल पाटलांनी घेतलेल्या यूटर्नमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

13 Sep 2024, 16:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद

दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून रात्रीच्या दरम्यान बिबट्याने अतुल शिंदे यांच्या घरच्या श्वानावर हल्ला केला असून जखमी श्वानाला बिबट्या घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा सारखा वावर असल्याने अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. 

13 Sep 2024, 16:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर बाप्पाची आरती 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान गणपतीची आरती करण्याचा मान आज शेतकऱ्यांच्या मुलांना मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले त्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरती साठी निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातून एकूण 25 मुले आणि 25 मुली वर्षावर दाखल झाले होते.  गेल्यावर्षी देखील या सर्वांना आरतीसाठी बोलावून मुख्यमंत्री यांनी या मुलांना मदत केली होती. 

13 Sep 2024, 15:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर गंभीर आरोप

तंत्रज्ञानाचा वापर करताना लाडकी बहीण योजनेत सारख्या चुका कश्या निघतात मग यांनी काय केलं आहे? डेटा कसा जमा केला? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही. हिट अँड रनच्या घटना रोज होत आहेत. ड्रग्जचे प्रमाण वाढले आहे. कोयता गँगची दहशत वाढली आहे. त्यामुळे सुरक्षितता राहिली का नाही? देशात अंधाधुंद कारभार चालला आहे. यांना फक्त घर आणि पक्ष, इनकम टॅक्स, इडी आणि सीबीआयसोडून यांना वेळ कुठे आहे. आयुष्यभर लढत राहू. संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपाने केल्यास शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.