'इमर्जन्सी' वादानंतर कंगनाला आणखी एक मोठा धक्का, चित्रपट पुन्हा अडचणीत येणार?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या  'इमर्जन्सी' चित्रपटाबाबतचा वाद आणखी वाढला आहे. चंदीगड जिल्हा न्यायालयाने कंगनाच्या चित्रपटाबाबत नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर 5 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 18, 2024, 12:15 PM IST
 'इमर्जन्सी' वादानंतर कंगनाला आणखी एक मोठा धक्का, चित्रपट पुन्हा अडचणीत येणार?  title=

Kangana Ranaut : सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र, तिचा 'इमर्जन्सी' चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. अशातच आता चंदीगड जिल्हा न्यायालयाने तिच्या चित्रपटाबाबत नोटीस बजावली आहे. रविंद्र सिंह बस्सी यांनी तिच्या चित्रपटाबाबत एक अर्ज दाखल केला असून कंगनाने तिच्या चित्रपटात शीख धर्माची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवस आधीच रद्द करण्यात आला. 'न्यूज 18'च्या एका कार्यक्रमात कंगना रणौतने एक वक्तव्य केले होते की, या चित्रपटासाठी मी माझी वैयक्तिक संपत्ती पणाला लावली होती. हे चित्रपटगृहात दाखवायचे होती पण आता तो प्रदर्शित होत नाहीये. म्हणून, ही मालमत्ता आहे जी कठीण काळात विकली जाऊ शकते. या महिन्याच्या सुरुवातीला कंगनाने मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल येथील बंगला 32 कोटी रुपयांना विकल्याच्या बातम्या आल्या होत्या.

कंगना रणौतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कंगना रणौतला याआधी देखील या चित्रपटाबाबत शीख समुदायाकडून धमक्या आल्या होत्या. अशातच आता वकिलांनी अर्जात म्हटले आहे की, कंगना रणौतने 'इमर्जन्सी'मध्ये शिखा धर्माची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली असून त्याबरोबर समाजावर खोटे आरोप देखील केले आहेत. त्यामुळेच या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणी कोर्टात 5 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये कोण-कोण? 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये सतीश कौशिक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. जो त्याच्या मृत्यूनंतर एक वर्षाने प्रदर्शित होत आहे.