14 Nov 2024, 09:40 वाजता
नागपुरात 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त
Nagpur Cash Seized : नागपुरात पोलिसांनी 1 कोटी 35 लाखांची रक्कम जप्त केलीये.. याप्रकरणी पोलिसांनी शाकीर खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.. विशेष म्हणजे स्कूटीवरुन हा व्यक्ती कोट्यवधींची रक्कम घेऊन चालला होता.. पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. एका बांधकाम व्यावसायिकाची ही रक्कम असल्याचा दावा त्यानं केलाय... पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत..
14 Nov 2024, 09:39 वाजता
OBC विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण वाट बिकट
OBC Student Scholarship : 60 टक्क्यांची अट घातल्यामुळे ओबीसी उमेदवारांची उच्च शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. जुन्या नियमानुसार ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरले आहेत. मात्र, सरकारने नुकतीच शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केल्याने या नव्या अटीमुळे लाभार्थी संभ्रमात पडलेत. तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी शिक्षण, वास्तूकला शिक्षण अशा महाविद्यालयांतून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारने प्रोत्साहनपर योजनां जाहीर केल्यात.. मात्र नव्या अटीमुळे बारावीनंतर शिक्षण घेणारे विद्यार्थीच या योजनांपासून वंचित राहणार आहेत... त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Nov 2024, 08:31 वाजता
विधानसभा काबिज करण्यासाठी भाजपची रणनीती
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा काबिज करण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय.. भाजप आता माझा बूथ, सर्वात मजबूत बूथ अभियान सुरु करणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १६ नोव्हेंबरला या अभियानाची सुरुवात होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत..
14 Nov 2024, 07:48 वाजता
पंतप्रधान मोदींच्या राज्यात आज 3 प्रचार सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आज मोदींच्या तीन जाहीर सभा पार पडणार आहे.. मोदींची आज दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत जाहीर सभा पार पडणार आहे. तर दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची खारघर येथे सभा होणार आहे तर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडणार आहे.. त्यांच्या सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आलीय..
14 Nov 2024, 07:45 वाजता
खासदार असदुद्दीन ओवैसींना प्रचार सभेतच पोलिसांची नोटीस
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओविसी यांना सोलापूर पोलिसांनी काल नोटीस दिली.. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेदरम्यान पोलिसांनी ओवेसींना ही नोटीस बजावली.. भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नका तसंच प्रक्शोभक भाषण करू नका असं या नोटीसमधून सांगण्यात आलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा -