26 Jan 2025, 21:32 वाजता
सांगलीमध्ये अवघ्या 50 रुपयांच्या वादातून दुकानदाराची हत्या
Sangli Murder : सांगलीमध्ये मोबाईलचा स्क्रीन गार्ड एका मोबाईल दुकानदाराच्या जिवावर बेतलाय.. मोबाईल शॉपीमध्ये अवघ्या 50 रुपयांच्या वादातून दुकानदाराची हत्या.. 50 रुपयांच्या स्क्रीन गार्डच्या भाव करण्यावरुन 3 ते 4 अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी दुकानदारावर वीस ते पंचवीस वार करून त्याची हत्या केली.. सांगली शहर एसटी बस डेपो भागातील धक्कादयक घटना.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Jan 2025, 19:52 वाजता
नीट यूजी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल
NEET UG Exam : मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. नीट यूजी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल.. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून परीक्षा पद्धतीत बदल.. ऐच्छिक प्रश्न हटवले, वेळही केला कमी.. नीट यूजी परीक्षेत आता 200 ऐवजी 180 प्रश्न असणार.. --
परीक्षेच्या वेळेत 20 मिनिटांची कपात.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Jan 2025, 18:48 वाजता
टोरेस घोटाळाप्रकरणी तौसिफ रियाझला पोलीस कोठडी
Torres Fraud Scam : टोरेस घोटाळाप्रकरणी तौसिफ रियाझला पोलीस कोठडी.. कोर्टाने तौसिफला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावलीय.. तौसिफ रियाझ टोरेस कंपनीचा सीईओ.. शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने लोणावळामधून तौसिफ रियाझला अटक केली. टोरेसकडून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Jan 2025, 17:51 वाजता
नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांना विषबाधा
Nanded Devotees poisoned : नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांना विषबाधा.. पन्नासहून अधिक भाविकांवर उपचार सुरू.. उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती.. चार भाविकांची प्रकृती गंभीर.. बाधित रुग्णांवर माहूरच्या रुग्णालयात उपचार सुरू.
26 Jan 2025, 14:21 वाजता
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत - आदिती तटकरे
Aditi Tatkare : राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारने कुठलेही निकष बदललेले नसल्याचे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलंय... चालू वर्षात 2 कोटी 41 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे... ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असे सांगत आहे... त्यांच्याबाबत निर्णय घेणे सुरू असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.. या योजनेची सुरूवातीपासूनच विरोधकांना धास्ती वाटत होती त्यामुळे चुकीचा प्रचार केला जात असल्याचा टोला आदित तटकरेंनी लगावलाय...
26 Jan 2025, 14:05 वाजता
वाशिमच्या पालकमंत्रिपदावरून हसन मुश्रीफांची नाराजी कायम?
Washim Hasan Mushrif : वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला... मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते तात्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले.. त्यांच्या दौ-यात कोणत्याही प्रशासकीय बैठकांचा समावेश नसल्याने पालकमंत्री पदावरील त्यांची नाराजी कायम असल्याचं बोललं जातंय...हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केलीय... वाशिमची आकांक्षीत जिल्हा अशी असलेली ओळख पुसून विकासासाठी अधिक गती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले...पालकमंत्रिपदावरील नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफांनी आपण योग्य योग्य ठिकाणी बोलू असं वक्तव्य केलंय..तसेच अजित पवारांशी पालकमंत्रिपदाबाबत चर्चा केली असून, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय...
26 Jan 2025, 14:04 वाजता
पालकमंत्रिपदावरुन झिरवाळांची खदखद
Gurdian Minister : प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोलीत गेलेल्या पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनातील खदखद बोलावून दाखवली. नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यावरून गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले. मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना याबाबत विचारणा करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.. यावरून खासदार संजय राऊतांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर हल्लाबोल केलाय... शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे गरीब कसे असू शकतात असा टोला राऊतांनी झिरवळांना लगावलाय..
26 Jan 2025, 12:37 वाजता
कोस्टल रोड-सी लिंक जोडपुलाचं लोकार्पण
Mumbai : मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचं गिफ्ट मिळालंय. कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणा-या पुलाचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला . लोकार्पण कार्यक्रमापूर्वी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुलामुळे वाहतुकीवर ताण कमी होण्यास मदत होणारेय. पुलाचं लोकार्पण जरी आज झालं असलं तरीही मुंबईकरांना या पुलावरून वाहतूक ही उद्यापासून सुरू होणार आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणारेय
26 Jan 2025, 09:59 वाजता
शरद पवारांचे 30 जानेवारीपर्यंत सर्व दौरे रद्द
Sharad Pawar : शरद पवारांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेत. तब्येतीच्या कारणास्तव दौरे रद्द झाल्याची माहिती मिळतेय. डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला शरद पवारांना दिलाय. शरद पवार सध्या सिल्व्हर ओक निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.
26 Jan 2025, 09:58 वाजता
राज्यात गिया बार्रे आजारानं पहिला बळी
Pune GBS Death : राज्यात गिया बार्रे आजारानं पहिला बळी घेतलाय... पुण्यातील गिया बार्रेच्या रुग्णाचा मृत्यू झालाय.. पुण्यातील DSK विश्वमध्ये हा तरुण राहात होता.. मृत तरुण हा मुळचा सोलापूरचा आहे.. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात गिया बार्रेची लागण झाली होती.. तब्येत खालावल्यानं त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आलं होतं.. मत्र त्याला पुन्हा श्वशनाचा त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाला..