26 Jan 2025, 09:58 वाजता
राज्यात गिया बार्रे आजारानं पहिला बळी
Pune GBS Death : राज्यात गिया बार्रे आजारानं पहिला बळी घेतलाय... पुण्यातील गिया बार्रेच्या रुग्णाचा मृत्यू झालाय.. पुण्यातील DSK विश्वमध्ये हा तरुण राहात होता.. मृत तरुण हा मुळचा सोलापूरचा आहे.. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात गिया बार्रेची लागण झाली होती.. तब्येत खालावल्यानं त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आलं होतं.. मत्र त्याला पुन्हा श्वशनाचा त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाला..
26 Jan 2025, 09:02 वाजता
नागपुरातील संघ मुख्यालयात ध्वजवंदन
Nagpur RSS : प्रजासत्ताक दिनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातोय. महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. ध्वजारोहणानंतर CISF,पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मानवंदना देण्यात आली
26 Jan 2025, 09:00 वाजता
भिवंडीत सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजवंदन
Bhiwandi Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते भिवंडीमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं.. भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्याल व कनिष्ठ महाविद्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं.. त्यानंतर त्यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं..
26 Jan 2025, 08:28 वाजता
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून जरांगेंचं आमरण उपोषण अंतरवाली सराटीत सुरू झालंय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केलीय. यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समजाला आरक्षण देतील असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय
26 Jan 2025, 08:23 वाजता
देशात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
Republic Day : देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर संचलनाचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सचलन सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अमेरिकेनंही भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
26 Jan 2025, 08:10 वाजता
पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम रुग्णांच्या रुग्णसंख्येत वाढ
पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गीया बार्रे सिंड्रोम(GBS) रुग्णांच्या रुग्णसंखेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात GBS आजाराची रुग्णसंख्या 73 वर पोहोचले आहे. तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी पुण्यात GBS या रुग्णाचे एकुण 9 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात पुन्हा GBS चा धोका वाढण्याची शक्यता आहे.
26 Jan 2025, 08:08 वाजता
मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालाच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. संचलन सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.