Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jan 26, 2025, 17:39 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Jan 2025, 17:37 वाजता

नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांना विषबाधा

 

Nanded Devotees poisoned : नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांना विषबाधा.. पन्नासहून अधिक भाविकांवर उपचार सुरू.. उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची  आमटी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती.. चार भाविकांची प्रकृती गंभीर.. बाधित रुग्णांवर माहूरच्या रुग्णालयात उपचार सुरू.

25 Jan 2025, 21:14 वाजता

उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

 

Uday Samant : उपमुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर उदय सामंतांचा गौप्यस्फोट.. वडेट्टीवार स्वतःसाठी प्रस्ताव घेऊन गेले होते.. 'वडेट्टीवारांनी स्वत:च्या नावाचा प्रस्ताव शिंदेंकडे आणला होता'.. मी आडकाठी वाटत असल्याने माझी बदनामी सुरू केली असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलाय.. कुणामार्फत कोण गेलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे असं उदय सामंत म्हणालेत.. तर ज्यांचा अस्त झालाय त्यांनी स्वत:चा उदय करुन घेऊ नये असा जोरदार टोला उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवारांना लगावलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

25 Jan 2025, 17:06 वाजता

खासगी शाळेत शिरून शिक्षकाला मनसेकडून 'धडा'

 

Teacher beaten up by MNS : ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला चोप.. एका खासगी शाळेतील शिक्षकाने महिला शिक्षकांसोबत केला गैरप्रकार.. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील घटना. खासगी शाळेत शिरून शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडूनकडून 'धडा'.

25 Jan 2025, 17:02 वाजता

खासगी शाळेत शिरून शिक्षकाला मनसेकडून 'धडा'

 

Teacher beaten up by MNS : ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला चोप.. एका खासगी शाळेतील शिक्षकाने महिला शिक्षकांसोबत केला गैरप्रकार.. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील घटना. खासगी शाळेत शिरून शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडूनकडून 'धडा'.

 

25 Jan 2025, 14:18 वाजता

एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना UBT आंदोलन करणार

 

Shivsena UBT Protest : 3 महिन्यांपूर्वीच एस टी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात असल्याचं सांगितलं होतं मग आता भाडेवाढ़ कशासाठी असा सवाल विरोधी पक्षानेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय.... एसटी मध्ये 2800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे मी समोर आणल्या नंतर ते टेंडर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थांबवल्याचे दानवे म्हणाले... एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे भाडेवाढ करायची... या विरोधात शिवसेना आंदोलन पुकारणार असल्याचे दानवे यानी सांगितलंय... 

25 Jan 2025, 14:14 वाजता

वाल्मिक कराडच्या आजाराबाबत आव्हाडांकडून शंका उपस्थित

 

Jitendra Awhad : वाल्मिक कराडच्या या आजाराबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केलीय...वाल्मिकला ICUमध्ये ठेवलंय...आता त्याला मोठमोठे आजार होणार...त्यापेक्षा त्याला सोडून द्या, असा टोला आव्हाडांनी लगावलाय.

25 Jan 2025, 14:11 वाजता

एसटीच्या भाडेवाढीवरुन महायुतीत संभ्रम

 

ST Bus Price Hike : एसटीच्या तिकीट दरातील भाडेवाढीवरून महायुती सरकारमध्ये संभ्रमाचं चित्र दिसतंय... भाडेवाढीबाबत मंत्र्यांची वेगवेगळी भूमिका असल्याचं दिसतंय... परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी भाडेवाढीचं समर्थन केलं असून आजपासूनच भाडेवाढ लागू होणार असल्याचं सांगितलंय...तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र भाडेवाढीला विरोध केलाय...भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंही भाडेवाढीबाबत सकारात्मक नसल्याचं दिसतंय... त्यांनी जनतेशी निगडीत विषयावर मंत्रिमंडळातील चर्चेनंतर निर्णय व्हायला हवा असा सूर आळवलाय...

25 Jan 2025, 14:01 वाजता

एसटी भाडेवाढीच्या निर्णयाचं गोगावलेंकडून समर्थन

 

Bharat Gogawale : एसटी भाडेवाढीच्या निर्णयाचं मंत्री भरत गोगावले यांनी समर्थन केलंय. चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ करणं क्रमप्राप्त ठरतं. सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे. तसेच कर्मचा-यांचा पगार वाढला पाहिजे. त्यामुळे भाडेवाढ अवश्यक असल्याचं गोगावले म्हणाले.

25 Jan 2025, 13:30 वाजता

कोल्हापुरात एसटी भाडेवाढीवर संताप व्यक्त

 

Kolhapur : एसटीने  भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. झालेली भाडेवाढ ही आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिलीय.. तर दुसरीकडे ऑड फिगरमध्ये भाडेवाढ केल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतायत.

25 Jan 2025, 12:48 वाजता

विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारला इशारा

 

Nagpur Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय. ओबीसींचं आरक्षण डावलून निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाज सहन करणार नाही, असा इशाराही वडेट्टीवारांनी दिलाय...