Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jan 26, 2025, 17:39 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Jan 2025, 12:34 वाजता

नंदुरबारमध्ये एसटी बसेसची दुरवस्था

 

Nandurbar ST Bus : एकीकडे सरकारकडून एसटीची भाडेवाढ करण्यात आलीये. तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये भंगार बसमधून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा लागतोय. अत्यंत खिळखिळ्या झालेल्या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत.. अनेक बसेसच्या काचा सुटलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पत्र निघाले आहेत..हे. जर भाडे वाढ होत असेल, तर महामंडळाने नवीन बसेस तरी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.. 

25 Jan 2025, 11:51 वाजता

आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार

 

Tahawwur Rana's extradition: 2008 मधील 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणास मंजुरी दिली आहे. भारताकडून कित्येक वर्षांपासून पाकिस्तानी वंशीय कॅनडाचा नागरिक असलेल्या तहव्वूर राणाच्या प्रात्यार्पणाची मागणी करत होता. अखेर आता तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बातमी पाहा - भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

25 Jan 2025, 11:46 वाजता

पुण्यात गिया बार्रेचा धोका

 

Pune Ajit Pawar : गिया बार्रे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात अधिका-यांसोबत चर्चा केली.. जिल्ह्यातील GBS रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला..  पुण्यात सर्किट हाऊस इथं ही बैठक झाली.. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा  सतर्क असल्याचं ते यावेळी म्हणाले.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jan 2025, 11:35 वाजता

यवतमाळमध्ये स्कूल बसचा अपघात

 

Yavatmal School Bus : यवतमाळमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय. दिवटीपिंपरी गावातील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस उमरखेडच्या शाळेकडं निघाली होती. यावेळी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. यात एक नववीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. तर अनेक विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेत.

25 Jan 2025, 11:02 वाजता

भारत वि. इंग्लंड आज दुसरी टी-20 मॅच

 

India Vs England Second T-20 Match : चेन्नईत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-20 मॅच रंगणार आहे. चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही टीम्समध्ये लढत होणार आहे. कोलकात्यातील पहिल्या टी-20मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला होता.  टीम इंडिया सध्या 1-0नं आघाडीवर आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.. तर दुसरीकडे इंग्लंड आजची मॅच जिंकून सीरिजमध्ये कमबॅक करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.. 

 

25 Jan 2025, 10:08 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर 

 

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारेत. जालना शहरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आभार दौऱ्याला सुरुवात करणारेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीसह शिवसेनेला भरघोस यश मिळालं. त्यामुळे लाडक्या बहिणींसह मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे राज्यभरात आभार दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जालन्यातून सुरुवात होणारेय.

25 Jan 2025, 08:54 वाजता

आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच

 

Beed : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.. संतोष देशमुख यांच्या हत्येला 46 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये.. त्याचा शोध  पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत मात्र अजूनही तो तपास यंत्रणेंना गुंगारा देतोय..    बीड पोलिसांनी  त्याला फरार घोषित केलंय.. कृष्णा आंधळेची माहिती देणा-यांना पोलिसांनी बक्षीस जाहीर केलंय.. तसेच माहिती देणा-यांची नावही गोपित ठेवण्यात येणार आहे.. मात्र तरीही आंधळेंचा पत्ता लागलेला नाहीये.

 

25 Jan 2025, 08:52 वाजता

वाल्मिक कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करा  - अंजली दमानिया

 

Anjali Damania On Walmik Karad : वाल्मिक कराडचे सगळे मेडीकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ट्विटरवरून केलीय.

25 Jan 2025, 08:42 वाजता

मुंबईत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन

 

Mumbai Protest : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत निघणा-या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय.. या मोर्चात धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख सहभागी होणार आहेत..

25 Jan 2025, 08:18 वाजता

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण

 

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणारेत...अंतरवाली सराटीत सकाळी 11 वाजल्यापासून ते उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटीत जरांगेंचं हे सातवं उपोषण आहे.  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण होतंय. मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत, फडणवीस मराठ्यांना आरक्षण देतील असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -