Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

23 Dec 2024, 09:13 वाजता

यंदा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही?

 

Maharashtra Chitrarath still not included in Republic day : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा दिसणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.. कारण यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित राज्यांचे चित्ररथ निवडण्यात आलेत... मात्र या यादीत महाराष्ट्राला सध्या स्थान देण्यात आलेलं नाहीये.. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार की नाही याबाबत तूर्तास निश्चितता नाहीये.. तसेच दिल्लीतील चित्ररथालाही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

23 Dec 2024, 08:55 वाजता

धनंजय मुंडे आज घेणार पत्रकार परिषद

 

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज घेणार पत्रकार परिषद...बीडमध्ये दुपारी 3 वाजता मुंडेंची पत्रकार परिषद होणार...धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत काय बोलणार?..-देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपाला उत्तर देणार?...मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे माध्यमांशी बोलणार

23 Dec 2024, 08:11 वाजता

एसटी महामंडळ संकटात, एसटी तोट्यात

 

ST Mahamandal : एसटी महामंडळ संकटात, एसटी तोट्यात..रोज तीन ते साडेतीन कोटींचा तोटा..आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा... स्वमालकीच्या 3 हजारांहून जास्त बस घेण्याची फक्त घोषणाच

23 Dec 2024, 07:32 वाजता

राहुल गांधी आज परभणीत

 

Rahul Gandhi : राहुल गांधी आज परभणीत...सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट...सूर्यवंशी कुटुंबीयांचं राहुल गांधी कऱणार सात्वंन...सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठीत झाला होता मृत्यू..परभणी हिंसाचारानंतर सूर्यवंशी यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात...राहुल गांधी दुपारी सव्वादोन वाजता सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेणार आहे...तसेच आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच ह्रदय विकाराने निधन झालं होतं, दुपारी 3 वाजता वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी घेणार आहेत,

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

23 Dec 2024, 07:28 वाजता

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं, तिघांचा मृत्यू

 

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात... फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडले...या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती...यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे तर सहा जण जखमी झाले आहेत...जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे...ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली...डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची प्राथमिक माहिती...जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे....अपघातात जखमी झालेले सर्व जणं कामगार आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते...या फूटपाथ वर एकूण १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते...भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला

बातमीचा व्हिडीओ पाहा-