24 Dec 2024, 07:36 वाजता
मनोज जरांगेंचा आजपासून गाठीभेटी दौरा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर जाऊन गाठी भेटी घेणार आहेत. दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज ते पाथरी, पोखर्णी, शिंगणापूर फाटा मार्गे दामपुरी इथे मुक्कामी असणारेत. तर उद्या दामपुरी वरून पूर्णा तालुक्यातील आलेगाव इथे येणार आहेत, त्यानंतर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेणार आहेत, त्यानंतर मनोज जरांगे पाटील साळेगाव वरून बीड जिल्ह्यतील मस्साजोग इथे जाणार. पुढे नागझरी वरून अंतरवालीत येणार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 07:32 वाजता
3 दिवस हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट रात्रभर सुरु राहणार
The bar will be open all night on the 31st : नाताळसह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आज उद्या आणि 31 डिसेंबरला हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरु राहणार आहेत.. पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्यास गृहविभागानं परवानगी दिलीये.. या तीन दिवशी वाईनशॉप मध्यरात्री 1वाजेपर्यंत सुरु असतील तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअरबार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.. खुल्या जागेत होणा-या संगीत कार्यक्रमांसाठीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2024, 22:33 वाजता
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन
Shyam Benegal : ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालंय. त्यांना बऱ्याच दिवसापासून क्रोनिक किडनीचा त्रास होता. मुंबईतल्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांनी समांतर सिनेमांना वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले अंकूर, मंथन, निशांत, भूमिका, जुबैदा हे सिनेमे आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेत. त्यांनी फक्त सिनेमेच बनवले नाहीत तर शबाना आझमी, नसिरुद्दीन शहा, एम पुरी, स्मिता पाटील यासारख्या कलाकारांनाही घडवलं. श्याम बेनेगल यांना आजवर पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 22:00 वाजता
उपमुख्यमंत्री अजित पवारांची रोखठोक भूमिका
Ajit Pawar : राज्यात महायुतीला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे आता आमदार रुसला फुगवा काढुन समजूत काढावं असं काहीच करावे लागणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांच्यासह इतर नाराज आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट सुनावले देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि मी नाराजांचा मान सन्मान ठेवण्याचं काम आम्ही करू अशा काळजी आम्ही नक्की करू असा ही इशारा अजित पवारांनी दिला आहे हवेली तालुक्यातील एका खाजगी कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत होते
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 21:46 वाजता
कल्याणमध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना
Kalyan Triple Talaq : कल्याण पश्चिममध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आलीये,. एका 28 वर्षीय विवाहित महिलेला माहेरुन 15 लाख रुपये आणण्यासाठी पतीकडून मारहाण करण्यात आलाय.. पत्नीनं पैस न आणल्यानं तिला तलाक म्हणत तिला घराबाहेर काढल्याचा आरोप महिलेनं केलाय. याप्रकरणी पतीविरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 20:50 वाजता
'शेख हसीना यांना परत पाठवा', बांगलादेशचं भारताला पत्र
Bangladesh Letter To India : बांगलादेशाने भारताला पत्र लिहून माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केलीये...मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारने भारत सरकारला हे पत्र लिहिलं आहे..बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. बांग्लादेशामध्ये ऑगस्टच्या अखेरीस सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 20:26 वाजता
विनोद कांबळीची प्रकृती खालावली
Vinod Kambli : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडीच्या कोपर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....कांबळी याना युरीन इंपेक्शन आणि पायाला दुखापत झाली होती..मात्र उपचार दरम्यान स्कॅन केल्यानंतर ब्रेनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे..कांबळींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 18:48 वाजता
महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप
Mahayuti Minister Bunglow : महायुतीच्या मंत्र्याना बंगल्याचं वाटप करण्यात आलंय. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर दालनांचं वाटप जाहीर झालं. त्यानंतर अवघ्या काही तासांत मत्र्यांना कोणकोणते बंगले मिळणार याची यादी जाहीर करण्यात आलीय. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला मिळालाय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आलाय. पंकजा मुंडेंचा मुक्काम आता पर्णकुटी बंगला मिळणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 18:13 वाजता
राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर फडणवीस आणि शिरसाटांची टीका
Devendra Fadanvis, Sanjay Shirsat On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या परभणी दौ-यावरून सत्ताधा-यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय.. राहुल गांधींचा दौरा हा राजकीय हेतूनं असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीये.. तर राहुल गांधींनी परभणीचा दौरा करणं ही राजकीय नौटंकी असल्याचं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 18:06 वाजता
कल्याणच्या कोनगावात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक
Bhiwandhi Bangaladesh People Arrest : कल्याणच्या कोनगावमधील धर्मा निवास भागातील एका इमारतीतून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.. काही संशयास्पद कागदपत्रे,वस्तूसह 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -