23 Dec 2024, 16:50 वाजता
ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच
Thane Palakmantri : ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतंय..शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरुये...तर गणेश नाईक यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी जोर लावलाय...या आधी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक दोघे देखील ठाणे पालकमंत्री राहिले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा
23 Dec 2024, 16:29 वाजता
राहुल गांधींकडून सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन
Parbhani Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींची हत्याच केली, पोलिसांनीच त्यांची हत्या केली असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याबाबत खोटी माहिती दिली असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींशी बोलताना सूर्यवंशी कुटुंब खूप भावूक झालं होतं. आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबीयांनी राहुल गांधींकडे केली
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Dec 2024, 14:02 वाजता
धुळ्यात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक
Dhule 4 Bangladeshi People Arrested : धुळे शहरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक...4 बांगलादेशींमध्ये 3 महिलांचा समावेश... शहारातील आग्रा रोगडवरील खासगी लॉजमधून अटक...धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2024, 13:40 वाजता
प्रत्येकाला पालकमंत्रिपद हवं असतं-आदिती तटकरे
Aditi Tatkare : प्रत्येकाला पालकमंत्रिपद हवं असतं-आदिती तटकरे.. नेतृत्वाची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटत-तटकरे.. महायुतीतील 3 नेते निर्णय घेतील-आदिती तटकरे... 'फडणवीस, शिंदे, अजित पवार निर्णय घेतील' मंत्री आदिती तटकरेंची माहिती
23 Dec 2024, 12:43 वाजता
राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार?
Sanjay Raut : दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद- संजय राऊत...राज,उद्धव ठाकरे भेटीवर संजय राऊतांचं सूचक विधान...दोन्ही ठाकरेंवर महाराष्ट्राचं प्रेम- संजय राऊत...जे महाराष्ट्राच्या मनात तेच मलाही वाटतं - संजय राऊत... राज ठाकरेंच्या भाच्याचा लग्नसोहळा मुंबईतल्या दादरमध्ये पार पडला...या लग्न सोहळ्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय..राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बराचवेळ एकमेकांशी चर्चा करत असल्याचं दिसलंय.य.
23 Dec 2024, 12:12 वाजता
ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा 8-10 दिवसानंतर फडणवीसांसोबत बैठक - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : ओबीसींवर अन्याय होऊ देणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती भेटीनंतर छगन भुजबळांनी दिलीय....ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा 8-10 दिवसानंतर फडणवीसांसोबत बैठक होणार'..जे घडलं त्यावर मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन'...NCPला पर्याय म्हणून भाजपची निवड करणार का? प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी टाळलं
23 Dec 2024, 11:27 वाजता
छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट
Chhagan Bhujbal met CM Fadnavis : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट... सागर बंगल्यावर अर्धा तास दोघांमध्ये चर्चा...भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार...मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज
23 Dec 2024, 10:41 वाजता
छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल..छगन भुजबळ सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला...मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2024, 10:31 वाजता
गुजरातमधील अहमदाबादमध्ये पार्सलमध्ये स्फोट, 3 जण जखमी
Blast in Gujarat : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका पार्सलमध्ये स्फोट झालाय.. दाम्पत्याचा घटस्फोट झाल्यानंतर बदला घेण्यासाठी पार्सलमध्ये स्फोट घडवून आणण्यात आलाय.. पार्सल स्फोटात तिघे जखमी झाले झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.. ..जावयानं सासरे, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला धडा शिकवण्यासाठी पार्सल स्फोट घडवून आणल्याचं तपासातून समोर आलंय...रुपेन बरोट हा स्फोटाचा मुख्य आरोपी आहे.. पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2024, 09:41 वाजता
सनी लिओनी छत्तीसगड सरकारी योजनेची लाभार्थी?
Sunny Leone : राज्यातील गोरगरिबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणल्या जातात. मात्र जर आम्ही तुम्लाहा सांगितलं एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सरकारी योजनेचा लाभ घेतेय. तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अभिनेत्री सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी ठरलेय. छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा सनी लिओनीला लाभ मिळतोय. सनी लिओनीला दरमहा 1 हजार रुपये मिळतायत. सनी लिओनीच्य नावाचा नोंदणी फॉर्म व्हायरल होतोय. त्यामुळे खरचं अभिनेत्री सनी लिओनी हा लाभ घेतेय का अशी चर्चा सुरू झालीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-